शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला

By संतोष हिरेमठ | Updated: September 12, 2022 14:42 IST

''माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला.

औरंगाबाद :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी लालपरी म्हणजे एसटी बसचा मार्ग बदलण्यात आल्याचे समोर आले आहे. पैठणकडे औरंगाबाद आणि पाथर्डी-शेगावहून येणाऱ्या जाणाऱ्या बसचा मार्ग बदलण्यात आला आहे. 

''माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला. माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल देऊन लोकांना वाहतुकीत अडवून ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात औरंगाबाद येथील पैठण दौऱ्यात पैठण रोडवरून एसटीच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. औरंगाबादहून पैठणला जाणाऱ्या बस पाचोडमार्गे पाठविण्यात येत आहेत. तसेच पाथर्डी-शेगावहून येणाऱ्या बसेस नेवासामार्गे पाठवल्या आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कावसानकर स्टेडियम येथील नियोजनाची पाहणी केली. विमानतळ ते पैठण येथील नाथ मंदिरामार्गे सभेच्या मुख्य ठिकाणपर्यंतचा रस्त्याचा आढावा घेतला. विमानतळ ते पैठणपर्यंतचे रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाने दिले.

असा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरात येत आहेत. चिकलठाणा विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते वाहनाने पैठणकडे रवाना होती. दुपारी दोन वाजता त्यांची पैठणमध्ये सभा होईल. सभेनंतर ते आपेगावला जातील. पाच वाजता रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या निवासस्थानी ते जातील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता विमानाने मुंबईकडे रवाना होतील. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटीEknath Shindeएकनाथ शिंदे