शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरवासी करतात दररोज १०० टन खाद्यतेल फस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:50 IST

खाद्यतेलाचा वापर केलाच पाहिजे, पण अतिवापर करणे टाळावे. दररोज प्रतिव्यक्तीने १५ ते २० एमएलपेक्षा अधिक खाद्यतेल खाऊ नये.

छत्रपती संभाजीनगर : देशातील नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल होय. निरोगी आयुष्यासाठी तेलाचा अतिवापर टाळा असा कानमंत्र खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर येथे दररोज १०० टन खाद्यतेलाची विक्री होते, आता बोला.

१८ लाख लोक दररोज खातात १०० टन खाद्यतेलछत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या सुमारे १८ लाख आहे. पॅकिंग व सुटे खाद्यतेल मिळून दररोज अंदाजे १०० टन खाद्यतेलाची उलाढाल होते. प्रतिव्यक्ती सुमारे ७० ते ८० ग्रॅम तेलाचे दररोज सेवन करतो, असा याचा अर्थ होतो. उल्लेखनीय बाब म्हणजे, आहारतज्ज्ञांच्या मते, ४० वर्षांवरील प्रतिव्यक्ती दररोज १५ ते २० एमएल तेल, तर ४० वर्षांखालील व्यक्तींनी २० ते २५ एमएल तेल दररोज खाल्ले पाहिजे.

शहरवासीयांना आवडते सोयाबीन तेलकरडी तेल व शेंगदाणा तेलाचे भाव गगनाला भिडल्याने शहरवासी मागील काही महिन्यांपासून सोयाबीन तेलाला पहिली पसंती देत आहेत. १०० टन पैकी ६० ते ७० टन सोयाबीन तेल विकते. २० ते ३० टन सूर्यफूल तेल विकते, तर उर्वरित १० टन तेलामध्ये करडीतेल, शेंगदाणा, सरकी, पामतेल, राईस ब्रॅन तेल, सरसो तेलाचा समावेश होतो. यात ५० टक्के पॅकिंगचे, तर ५० टक्के सुट्टे तेल विकले जात असल्याची माहिती होलसेल व्यापारी राकेश पांडे यांनी दिली.

एका कुटुंबाला महिन्याला किती लागते तेल ?पती-पत्नी व त्यांचे दोन मुले, अशा चार जणांच्या कुटुंबाला महिन्याकाठी किती तेल लागते. याविषयी माहिती घेतली असता. किराणा दुकानात येणाऱ्या यादीवरून सुमारे ४.५० ते ५ लिटर खाद्यतेल खरेदी करीत असल्याचे निदर्शनात आले. अनिल पवार या व्यक्तीने सांगितले की, आम्ही दोघे व आमच्या दोन मुली असे आमचे कुटुंब आहे. दर महिन्याला आम्ही सोयाबीन किंवा सूर्यफुल तेलाची पाच लिटरची कॅन लागते.

अदलूनबदलून तेल खरेदी कराखाद्यतेलाचा वापर केलाच पाहिजे, पण अतिवापर करणे टाळावे. दररोज प्रतिव्यक्तीने १५ ते २० एमएलपेक्षा अधिक खाद्यतेल खाऊ नये. प्रत्येक तेलाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. उष्मांक वेगवेगळा असतो. यामुळे दर महिन्याला एकच तेल खरेदी न करता. प्रत्येक महिन्याला खाद्यतेल बदलून वापरत जा. एका महिन्यात सोयाबीन, तर दुसऱ्या महिन्यात सूर्यफूल, तर तिसऱ्या महिन्यात शेंगदाणा तेल असे बदलून वापरत जावे, मात्र तेलाचे प्रमाण मात्र नक्की पाळावे.अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

टॅग्स :foodअन्नchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर