शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईक बोलून गेला अन् दोन वर्षांपूर्वीची घरफोडी उघडकीस, चोराला बीडमधून अटक

By सुमित डोळे | Updated: January 13, 2024 15:53 IST

आशा मावळलेल्या तक्रारदाराला सोने परत मिळाले

छत्रपती संभाजीनगर : बीडच्या एका गुन्हेगाराने शहरात आल्यानंतर केलेल्या घरफोडीचा उल्लेख त्याच्या एका नातेवाइकाने सहज मित्राकडे गेला. ही बाब सिटी चौक पोलिसांपर्यंत पोहोचली अन् तब्बल २ वर्षे ५ महिन्यांनी फाजलपुऱ्यात झालेली घरफोडी उघडकीस आली. यात पोलिसांनी बीडहून गोपी किशन कांबळे (रा. नागोबा गल्ली, बीड) याला अटक केली. त्याने तेव्हा चोरलेले २४.८७ ग्रॅम सोने सराफाकडून जप्त करीत त्यालाही आरोपी केले.

फाजलपुऱ्यात राहणाऱ्या किशोर किसन खाजेकर यांच्या घरी ५ ऑगस्ट २०२१ रोजी चोरी झाली होती. चोराने सोने, दोन माेबाइल व १० हजारांची रोख रक्कम चोरली होती. तत्कालीन सिटी चौक पोलिस अधिकाऱ्यांना चोराचा शोध लावता आला नाही. सिटी चौक पोलिस ठाण्याचे अंमलदार उपनिरीक्षक अर्जुन कदम, मुनीर पठाण यांना या घरफोडीतील आरोपी बीडमध्ये राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. निरीक्षक निर्मला परदेशी यांनी त्यांना कारवाईच्या सूचना केल्या. कदम, पठाण, अंमलदार राजेंद्र साळुंके, रोहिदास खैरनार यांनी तत्काळ बीड गाठले. बेसावध गोपी घरात निवांत बसलेला असतानाच त्याला उचलून शहरात आणले.

असा झाला भांडाफोड गोपी हा बीडमधील कुख्यात गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याला २०२१ मध्ये बीडमधून तडीपार करण्यात आले. तेव्हा तो शहरात सिटी चौक परिसरात बहिणीकडे आला. त्याचदरम्यान त्याने खाजेकर यांचे घर फोडले. तडीपारीची मुदत संपल्यानंतर तो परत बीडला गेला. त्याने येथे घरफोडी केल्याचे एका नातेवाइकाला कळाले होते. आठ दिवसांपूर्वी तो बोलता बोलता एका व्यक्तीकडे ही बाब बोलून गेला आणि गोपीचा अनपेक्षित भंडाफोड झाला. त्याने सोने विकलेल्या सराफाकडून ते जप्त करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादBeedबीड