शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भगवान भक्तीगडावर यावर्षी गर्दीचा उच्चांक पाहायला मिळेल: दसरा मेळावा कृती समिती

By विकास राऊत | Updated: September 28, 2022 13:24 IST

या मेळाव्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने, उस्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

औरंगाबादलोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची दसरा मेळाव्याची परंपरा अखंड ठेवत, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र सुपे सावरगाव (घाट) येथील श्री भगवान बाबा भक्ती गडावर या वर्षीचा दसरा मेळावा पार पडणार आहे. मागील वर्षी कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित मेळावा आयोजित केलेला असताना सुद्धा अलोट गर्दी दसरा मेळाव्यास लोटली होती. यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त वातावरणात दसरा मेळावा होणार असल्यामुळे गर्दीचा उच्चांक मैदानावर होईल, अशी अपेक्षा दसरा मेळावा कृती समितीचे संयोजक तथा भाजपा प्रदेश सचिव प्रवीण घुगे यांनी व्यक्त केली.

सुरुवातीचे अनेक वर्ष भगवानगडावर हा मेळावा आयोजित केला जात होता, परंतु, मेळाव्याचे ठिकाण अचानक बदलून ही २४ तासामध्ये लाखोंच्या उपस्थितीत दसरा मेळावा संपन्न झाला होता. सुपे सावरगाव येथे भक्ती व शक्तीच्या भावनेने भारावलेल्या जनतेचा उच्चांक रेकॉर्ड असलेला मेळावा पंकजा यांच्या नेतृत्वात पार पडला होता. या मेळाव्यामध्ये राज्यभरामधून व परराज्यातून देखील अनेक भाविक मोठ्या भक्तीभावाने या मेळाव्यास उपस्थित राहत असतात, सर्व ठिकाणाहून येणाऱ्या भक्तगणांना भगवान भक्ती गडावर विविध सामाजिक उपक्रम व सामाजिक संदेशपर भाषण व आगामी काळामध्ये सामाजिक वाटचालीची दिशा देणारे भाषण म्हणून जनतेला मेळाव्याची उत्सुकता असते.

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी विविध सामाजिक प्रश्न हाताळले आहेत. राज्य व देशभरात मुलीच्या जन्माचे स्वागत वाढवण्यासाठी केलेले उपक्रम असो की मंदिर परिसरातील स्वच्छता कार्यक्रम, तसेच तरुणांमधील व्यसन मुक्तीसाठी निर्धार असे अनेक विषय पंकजा मुंडेंनी हाताळले आहेत व एक प्रचंड मोठा सामाजिक संदेश व समाज परिवर्तनाची शिक्षणाची व सामाजिक संदेश देण्याची दिशा समाजाला यामधून मिळते. दिवंगत स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ही या दसरा मेळाव्यामधून गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकांचे प्रश्न, ऊसतोड कामगारांचे प्रश्न व त्यांच्या समस्या सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्यांचे विषय मांडले आहेत व ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते, या मेळाव्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने, उस्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. असे या वेळी पत्रकार परिषदेत दसरा मेळावा कृती समितीच्यावतीने संयोजक प्रवीण घुगे यांनी केले. यावेळी नवनाथ महाराज आंधळे, सतीश नागरे, मनोज भारस्कर, दीपक ढाकणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेAurangabadऔरंगाबाद