शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

‘एनआयसीयू’त दाखल तान्हुल्यांची संख्या वाढतेय; ३ हजार तान्हुले पुन्हा आईच्या कुशीत

By संतोष हिरेमठ | Updated: March 11, 2024 12:24 IST

आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तरच सुदृढ बाळ; ७ वर्षांत ‘एनआयसीयू’त दाखल होणाऱ्या तान्हुल्यांमध्ये एक हजाराने वाढ

छत्रपती संभाजीनगर : जन्मानंतर आईच्या कुशीत जाण्याऐवजी दररोज अनेक तान्हुले ‘एनआयसीयू’त दाखल होत आहेत. सर्वसामान्यांच्या भाषेत काचेच्या पेटीत. मात्र, वर्षभरात सुमारे ३ हजार शिशूंना पुन्हा आईच्या कुशीत सुरक्षितपणे पाठविण्याची किमया घाटीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागाने केली. गेल्या ७ वर्षात ‘एनआयसीयू’त दाखल होणाऱ्या तान्हुल्यांमध्ये एक हजाराने वाढ झाली आहे.

घाटीतील प्रसूतिशास्त्र विभागात दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. त्यातील दररोज १०-१२ नवजात शिशू हे नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल होतात. यामध्ये ६० टक्के बालके ही कमी वजनाची आणि अपूर्वकालीन प्रसूतीत जन्मलेली असतात. ४२ खाटांच्या या विभागात एकावेळी ६० ते ७० अत्यवस्थ नवजात शिशू उपचार घेत असतात. गेल्या वर्षभरात तब्बल ३ हजार २३३ शिशूंना ‘एनआयसीयू’त दाखल करावे लागले. दुर्दैवाने २१० शिशू दगावले.

‘एनआयसीयू’त का होतात दाखल?प्रामुख्याने अपूर्वकालीन प्रसूती, कमी वजनाची बालके, जन्मतः न रडणारे शिशू, जन्मतः बाह्य किंवा अंतर्गत अवयवांचे व्यंग असणाऱ्या शिशूंचा समावेश असतो. रक्तदाब, किडनीचे आजार, थायरॉइड, दमा, हृदयाचे आजार, थॅलेसेमिया आजार असलेल्या स्त्रियांनी मातृत्व स्वीकारण्याआधीच या आजाराचा धोका लक्षात घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग, प्राणायाम व पुरेशी झोप घेतल्यास मानसिक स्वास्थ्यही चांगले राहील, असे तज्ज्ञांनी म्हटले.

घाटीतील २०१६ ची स्थिती

एकूण प्रसूती - १६ हजार २८८‘एनआयसीयू’त दाखल शिशू- २ हजार १५५

घाटीतील २०२३ ची स्थितीएकूण प्रसूती - १९ हजार ४५१‘एनआयसीयू’त दाखल शिशू- ३ हजार २३३

आहाराकडे द्या लक्षलहानपणापासूनच मुलींच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. गरोदरपणात डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आयर्न, कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या. गरोदर मातांनी कोणत्याही गोष्टीचे ‘टेन्शन’ घेऊ नये. वेगवेगळ्या प्रदूषणांचाही गर्भातील बाळावर परिणाम होतो.- डाॅ. एल. एस. देशमुख, नवजात शिशू अतिदक्षता विभागप्रमुख, घाटी

गर्भधारणेपूर्वीपासून घ्या काळजीसुरक्षित मातृत्वासाठी महिलेचे वय हे किमान २० वर्षे असावे. गर्भधारणा होण्यापूर्वी तीन महिने आधीपासून फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचे सेवन करावे. गरोदर मातेला पौष्टिक, समतोल प्रोटीन व जीवनसत्त्वयुक्त आहार देणे बाळाच्या वाढीसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.- डाॅ. घनश्याम मगर, स्त्रीरोग, वंध्यत्वतज्ज्ञ व लॅप्रोस्कोपी सर्जन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यpregnant womanगर्भवती महिला