शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

डाॅक्टरांचा नवा सहकारी, निदान आणि उपचारांचे ‘एआय’ काम करतो भारी!

By संतोष हिरेमठ | Updated: February 28, 2025 17:45 IST

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: रुग्णालयांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढतोय वापर

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही कल्पना करा, तुम्ही डॉक्टरकडे जातात आणि तुमच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर क्षणार्धात तुमच्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, आहाराचा चार्ट आणि व्यायामाचा प्लॅन मिळतो. होय, हे आता शक्य आहे, कारण रुग्णालयांमध्ये आता ‘एआय’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, डायट चार्ट, एक्सरसाइज प्लॅन तयार करण्यापासून ते निदान आणि उपचारांसाठीदेखील ‘एआय’चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. विज्ञान आणि आरोग्य यांचा संगम असलेल्या ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा उपयोग समाजासाठी होऊ लागला आहे. ‘एआय’मुळे प्रारंभी आरोग्य क्षेत्रातून चिंता व्यक्त करण्यात आली; परंतु आता आरोग्य क्षेत्रात ‘एआय’चा वापर वाढत आहे.

एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅनसारख्या तपासण्यांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी ‘एआय’चा वापर होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक असे ‘एक्स-रे विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही मशीन दाखल झाली आहे. एक्स-रे काढल्यानंतर अवघ्या काही क्षणांत, अगदी डाॅक्टरांच्याही आधी रुग्णाला नेमके काय झाले आहे, याचे निदान ‘एआय’ करीत आहे.

फंडोस्कोपी अन् ‘एआय’...फंडोस्कोपी ही एक महत्त्वाची वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्याद्वारे डोळ्याच्या आतील भागाचा, विशेषतः रेटिनाचा अभ्यास केला जातो. आता एआयचा उपयोग ‘फंडोस्कोपी’मध्ये होत आहे. एआय-आधारित सॉफ्टवेअर रेटिनातील अगदी लहानशा बदलांचे अचूक विश्लेषण करून डायबेटिक रेटिनोपथी, ग्लॉकोमा आणि मॅक्युलर डीजेनेरेशनसारख्या आजारांचे लवकर निदान करण्यात मदत करत आहे. स्मार्ट अल्गोरिदमच्या मदतीने ‘एआय’ डिजिटल प्रिस्क्रिप्शन करून देत आहे. त्याचबरोबर रुग्णाचे डायट आणि फिटनेस चार्ट तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरत आहे. रोबोटिक यंत्रातही ‘एआय’चा वापर होत आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

हृदयरोग, मधुमेहाचा धोकाही सांगेलशहरात आता रुग्णालयांत ‘एआय’चा अनेक उपचारासाठी वापर होऊ लागला आहे. आगामी काही वर्षात आरोग्य तपासणीनंतर एखाद्या व्यक्तीला पुढे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका येण्याचा, मधुमेहाचा धोका आहे का, हेही ‘एआय’ सांगू शकणार आहे. रोबोटिक सर्जरी म्हणजे एकप्रकारे ‘एआय’चा प्रकार आहे.- डॉ. अजय रोटे, मधुमेहतज्ज्ञ व ‘अमेरिकन बोर्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मेडिसिन’ प्रमाणपत्रधाकरतज्ज्ञ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्यArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर