शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

मेंदीचा ट्रेड बदलला; नवरा लग्नाआधीच नवरीच्या मुठीत, लग्नसराईत पोर्ट्रेट मेंदीची क्रेझ 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 21, 2023 13:34 IST

आपल्या तळहातावरील मेंदीत आपल्या ‘प्रियतम’ नवऱ्याचे छायाचित्र काढून घेतले जात आहे. यासाठी हजारो रुपये खर्च केले जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर : नवीन लग्न झालेला नवरा आपल्या बायकोची कड घेऊ लागला तर थट्टेने नातेवाईक म्हणतात की, ‘बघा, मुलगा बायकोच्या तालावर नाचू लागला!’ पण, आता तर लग्नाअधीच नवरा नवरीच्या मुठीत गेल्याचे म्हटले जाऊ लागले आहे. त्यास कारणही तसेच आहे. लग्नसराईत पोर्ट्रेट मेंदीची क्रेझ नववधूमध्ये आली आहे. आपल्या तळहातावरील मेंदीत आपल्या ‘प्रियतम’ नवऱ्याचे छायाचित्र काढून घेतले जात आहे. यासाठी हजारो रुपये खर्च केले जात आहेत.

‘मेंदीवाले हाथ वो तेरे पायल वाले पांव... याद बहोत आते है मुझको तू और अपना गाव’ हे ‘मेंदीवाले हाथ’ या नावाच्या अल्बममधील गाणे खूप लोकप्रिय झाले होते, तसेही हिंदी व मराठी चित्रपटांत मेंदीवर अनेक गाणी लिहिली गेली व ती सुपरहिटही ठरली आहेत. भविष्यात पोर्ट्रेट मेंदीवर जर गाणे आले तर नवल वाटायला नको.

काय आहे पोर्ट्रेट मेंदी?लग्नसराईत नववधू आपल्या हातावर सुंदर, सुरेख नक्षीकाम केलेली मेंदी काढतात. काळानुरूप त्या नक्षीकामात बदल होत गेले. आता नववधूंमध्ये तळहातावर आपल्या जीवनसाथीचे छायाचित्र काढण्याचा ट्रेंड आला आहे. होय. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी व त्याची आठवण आली की, तळहाताकडे पाहण्यासाठी हा नवीन ट्रेंड नववधूप्रिय ठरत आहे. मेंदीद्वारे छायाचित्र काढले जात आहे.

कशी काढली जाते ही मेंदी?पोर्ट्रेट मेंदी हा सध्या लग्नसराईतील नववधूप्रिय प्रकार आहे. आपल्या जीवनसाथीचे हुबेहूब छायाचित्र मेंदीच्या साह्याने काढले जाते. हा प्रकार पहिले टॅटूमध्ये होता. ते पोर्ट्रेट टॅटू तळहात सोडून शरीरावर कुठेही काढले जातात. पोर्ट्रेट मेंदीत कार्बनचा वापर केला जातो. फोटोची कॉपी करून हातावर काढली जाते. मेंदीने टेन्सील होते. त्याद्वारे चेहरा काढला जातो. मेंदीचा रंग उडाला की, पोर्ट्रेटही निघून जाते. पोर्ट्रेट टॅटू शरीरावर कायमस्वरूपी राहते.

पोर्ट्रेट मेंदीसाठी किती खर्च येतो?पोर्ट्रेट मेंदीत आर्टिस्ट जेवढा शार्प असेल तेवढी रक्कम वाढत जाते. नवीन मेंदी आर्टिस्ट ३ हजार ते ६ हजारांपर्यंत रक्कम आकारतात, तर अनुभवी शार्प आर्टिस्ट ८ हजार ते १० हजारांपेक्षा अधिक रक्कम आकारतात.- सीमा कस्तुरे, आर्टिस्ट

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबाद