शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या उद्योजकाचे घर फोडले: आठ तोळे सोन्यासह रोख १ लाख रुपये लंपास

By राम शिनगारे | Updated: May 12, 2023 21:42 IST

एन ४, सिडको भागातील घटना.

छत्रपती संभाजीनगर : नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या उद्योजकाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना ११ मे रोजी पहाटे उघडकीस आली. यात आठ तोळे सोने, एक लाख रुपयांची रोकड असा सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचा ऐवज चोरट्यांनी लंनास केला. ही घटना गुरुसहानीनगर, एन ४, सिडको भागात घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

उद्योजक दिलीप आबासाहेब पठाडे (रा. अबोली अपार्टमेंट, डी-२, तिरुपती पार्क, गुरुसहानी नगर, एन-४, सिडको) हे योगेश कदम यांच्या घरात किरायाने राहतात. त्यांची शेंद्रा एमआयडीसीत फिल्ड ग्रीप कंपनी आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नीच्या मामाच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांची पत्नी मुलांसह दोन दिवस आधीच गेली होती. १० मे रोजी दुपारी १२ वाजता घराला कुलूप लाऊन दिलीप पठाडे हे लग्नासाठी ढवळापुरी येथे गेले. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते पत्नी, मुलांसह ११ मे रोजी पहाटे ४ वाजता घरी पोहचले. त्यांनी गेटचे कुलूप उघडून घराचे कुलूप उघडण्यासाठी गेले असता दरवाजा उघड दिसला. ते दरवाजा ढकलून आत गेले असता कपाटातील वस्तू अस्थाव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.

हा ऐवज गेला चोरीलादिलीप पठाडे यांच्या घरातून चोरांनी १३ ग्रॅमचे गंठण, २२ ग्रॅमचे शॉर्ट गंठण, ६.४० ग्रॅमची कर्णफुले, ४.५० गॅमचा कानातील सुईदोरा, ३ तीन ग्रॅमचे टॉप्स, २० ग्रॅमची मुलांची साेनसाखळी, ६ ग्रॅमच्या बाळी, २ ग्रॅमचे ओम, १ ग्रॅमचा कॉईन, ५० हजार रुपये रोकड, २० हजार रुपयांचे चांदीचे जोडवे, ब्रासलेट, चेन आदी दागिने आणि दहा वर्षांपासून जमा केलेला गल्ला, अंदाजे ५० हजार रुपये, असा सहा लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरीला गेला. अधिक तपास निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि. शेषराव खटाने करीत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद