शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय; गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ‘जुलूस-ए-मोहमदी’

By मुजीब देवणीकर | Updated: September 19, 2023 19:46 IST

शनिवार, ३० सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ. शेख मुर्तूझा यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर : प्रेषित हजरत मोहमद सल्लम यांचा जन्मदिवस २८ सप्टेंबर रोजी आहे. मुस्लीम बांधव हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त शहरात दरवर्षी ‘जुलूस-ए-मोहमदी’चे आयोजन करण्यात येते. या जुलूसमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा ईदच्या दिवशीच गणेश विसर्जन आहे. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी जुलूस (मिरवणूक) नंतर काढावी, अशी विनंती मुस्लीम बांधवांना केली. जुलूसच्या संयोजकांनी विनंती मान्य केली. शनिवार, ३० सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ. शेख मुर्तूझा यांनी दिली.

उर्दू कॅलेंडरनुसार १२ रब्बील अव्वलच्या दिवशी प्रेषित हजरत मोहम्मद सल्लम यांचा जन्म झाला. याला ईद-ए-मिलादुन्नबी म्हटले जाते. याच दिवशी शहरात ‘जुलूस-ए-मोहमदी’चे आयोजन करण्यात येते. मागील अनेक वर्षांची ही परंपरा आहे. यंदा ईद-ए-मिलादुन्नबी २८ सप्टेंबरला आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत जुलूस-ए-मोहमदीचे आयोजन केल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकतो. गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग आणि जुलूसच्या परतीचा मार्ग एकच आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त लोहिया यांनी जुलूसच्या संयोजकांसोबत बैठक घेतली. बैठकीत जुलूस नंतर काढावा, अशी सूचना करण्यात आली. बराच विचारविनिमय केल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी जुलूसचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी असदउल्ला तर्रार, ॲड. मझहर शुत्तारी, काझी आरेफ, ॲड. जियाउद्दीन बियाबाणी, शेख आसीफ, डॉ. शेख अश्फाक इक्बाल, काझी शकील, मुर्करम बागवाला, एजाज जैदी आदींची उपस्थिती होती.

वेळ, मार्ग दरवर्षीचाचदरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी ८:३० वाजता हजरत निजामोद्दीन चौक येथून ‘जुलूस-ए-मोहमदी’ला सुरुवात होईल. शहागंज चमन, राजाबाजार, नवाबपुरा, जिन्सी, जिन्सी चौक, कैसर कॉलनी, चंपा चौक, शहाबाजार, मंजूरपुरा, लोटाकारंजा, बुढीलाईन, जुनाबाजार, सिटी चौक, सराफा, गांधी पुतळामार्गे परत हजरत निजामोद्दीन चौक येथे येईल. मिरवणूक परत आल्यानंतर ध्वजारोहण करण्यात येऊन ‘सलाम’ पढण्यात येणार आहे.

अन्नदान, सरबत वाटपईद-ए-मिलादुन्नबी २८ सप्टेंबरला असून, याच दिवशी शहरातील विविध वसाहतींमध्ये परंपरेनुसार अन्नदान, सरबत वाटपसह आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतील. या शिवाय पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे मुख्य रस्त्यांवर आकर्षक रोषणाई सुद्धा केली जाईल, असे डॉ. मुर्तूझा यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuslimमुस्लीम