शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बदलले अन् ‘पुस्तकांचे गाव’ राहिले कागदावरच; पाहणीच्या पलीकडे हालचाल शून्य

By विकास राऊत | Updated: April 1, 2023 19:06 IST

मराठी वाचा आणि वाचवा, यासाठी २०१७ पासून सुरू असलेली ही योजना व्यापक करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : ‘हे ऑन वे’ या वेल्स इंग्लंडमधील गावाच्या धर्तीवर राज्यात ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना अस्तित्वात आली असून, जिल्ह्यातील वेरूळमध्ये गेल्यावर्षी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले पुस्तकांचे गाव सरकार बदलताच कागदावरच राहिले आहे. वेरूळ ग्रामपंचायतींतर्गत श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला ‘पुस्तकाचे गाव’ करण्यास शासनाने मार्च २०२२ मध्ये मान्यता दिली, परंतु उपक्रम अजूनही सुरू केलेला नाही.

पुस्तकाचे गाव उपक्रमासाठी शासनाने डिसेंबर २०२१ च्या शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत योजनेच्या विस्ताराला आर्थिक साह्य करण्याचा निर्णय घेतला होता. मराठी भाषा विभागाने याबाबत जानेवारी २०२२ मध्ये अध्यादेश जारी केला. त्यानंतर २५ मार्च रोजी सहा महसुली विभागांतून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून निवड केल्याचे शासनाने जाहीर केले होते. मराठी वाचा आणि वाचवा, यासाठी २०१७ पासून सुरू असलेली ही योजना व्यापक करण्यात आली. दरम्यान, निवड झालेल्या संस्थेची जागा पाहणी करण्यापलीकडे भाषा संचालनालयाने काहीही केलेले नाही.

यामुळे वेरूळची निवडपर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र, वाङ्मय, साहित्य चळवळ, ऐतिहासिक वारसा वैशिष्ट्ये, कृषी पर्यटन, पुस्तकांच्या खपात लौकिक असलेल्या गावांचा योजनेत समावेश होईल. या पूर्ण निकषांत वेरूळचा समावेश होतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर देवस्थान, जगप्रसिद्ध लेण्यांमुळे वेरूळमध्ये येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पुस्तकांचे गाव तेथे झाल्यास आणखी एक आकर्षण पर्यटकांसाठी वाढण्याच्या दृष्टीने वेरूळची निवड झाली. तंटामुक्त, वाचन संस्कृती, आदर्श गाव, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, निसर्गसंपन्नता, शांतता याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने योजनेत सहभागी होण्यास वेरूळचा प्रस्ताव दिला होता.

या ठिकाणी पुस्तकांचे गावलोकसहभाग, २५० चौ. फुटांची दहा दालने, जागेची सुरक्षितता, वाचकांसाठी सुविधा, संबंधित संस्थांची राज्य मराठी विकास संस्थेसोबत करार करण्याची अट आहे. एका दालनासाठी पाच लाख रुपये शासन अनुदान देण्याची तरतूद आहे. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन, भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांचे आयोजन निवड झालेल्या संस्थांना करण्याचा नियम आहे. छत्रपती संभाजीनगर (वेरूळ), नागपूर (नवेगाव बांध), सिंधुदुर्ग (पोंभुर्ले), पुणे (अंकलखोप) या ठिकाणी पुस्तकांचे गाव सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. वेरूळसह सर्व ठिकाणच्या गावांची अशीच परिस्थिती असल्याचे समजते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार