शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

मुलीच्या आईने धमकावले,घाबरलेल्या पंधरा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 19:38 IST

या प्रकरणी महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सोयगाव : एका पंधरा वर्षीय मुलाने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री फर्दापूर येथे घडली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद परवेज सय्यद राजिक (रा. ठाणा, ता. सोयगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

रविवारी (दि. १३) रात्री फर्दापूर येथील एका हॉटेलमध्ये सय्यद परवेज याने गळफास घेतल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाला रुग्णालयात हलविण्यात आले. शाळेत तू माझ्या मुलीच्या बेंचवर का बसला, असे म्हणून सदर महिलेने गुरुवारी (दि. १०) सय्यद परवेजला शिवीगाळ केली व तुझे नाव शाळेतून काढायला लावेल, अशी धमकी दिल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या नातेवाइकांनी केला.

आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतल्याने सोमवारी (दि. १४) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर मयत परवेजचे वडील सय्यद राजिक सय्यद आरीफ यांच्या फिर्यादीवरून फर्दापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू