शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

प्रथेला फाटा देत अखेरची इच्छा पूर्ण; पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, नातवाच्या हस्ते अग्निडाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 14:06 IST

बजाजनगरातील घटना; पाच मुलींनी सामाजिक प्रथेला फाटा देत जन्मदात्याला अखेरचा निरोप, नातवाने दिला अग्नीडाग

- शेख मेहमूद

वाळूज महानगर : प्रथेला फाटा देत पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला तर नातवाने आजोबाला अग्नीडाग दिला. जन्मदात्याची अंतिम इच्छा पूर्ण करीत समाजापुढे आदर्श निर्माण केल्याचा हा प्रसंग आज सकाळी बजाजनगरात घडला. परिसरात प्रथमच मुलींच्या खांद्यावर निघालेल्या या अंत्ययात्रेत अनेकजण सहभागी होते.

मालेगाव जि.नाशिक येथील पुरुषोत्तम चंदुलाल खंडेलवाल (७२ रा.बजाजनगर) हे २५ वर्षापुर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी अर्धागिनी मीना आणि रेखा, राखी, राणी, आरती व पुजा या मुलींसोबत बजाजनगरात आले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तसेच पाचही मुलीच असल्याने पुरुषोत्तम खंडेलवाल यांनी न डगमगता कापड विक्रीचा व्यवसाय सुरु केला. सायकलवरुन बजाजनगर व परिसरात दिवसभर कपडे विकुन पुरुषोत्तम खंडेलवाल हे कुटुंबाची उपजिवीका भागवित होते. मुलगा नसल्याची खंत न बाळगळता पुरुषोत्तम खंडेलवाल यांनी मुलींच माझे स्वप्न पुर्ण करतील, अशी आशा बाळगत खडतर परिश्रम घेत मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. 

सर्व मुलीं उच्चशिक्षीत झाल्यानंतर खंडेलवाल यांनी कपडे विक्रीतुन केलेल्या कष्टाईच्या कमाईतुन या पाचही मुलींचे लग्न लावुन दिले. मुली सासरी केल्यानंतर तसेच वयोमनानुसार कष्टाचे काम करता येत नसले तर त्यांनी आपला व्यवसाय सुरुच ठेवला होता. अशातच ९ वर्षापुर्वी आजारी पडल्यानंतर पुरुषोत्तम खंडेलवाल हे घरातच पडून होते. पतीच्या आजारपणात अर्धागिनी मिना खंडेलवाल व मुलगी राणी या दोघांनी त्यांची देखभाल केली. आजारपणातही पुरुषोत्तम खंडेलवाल हे पत्नी मीना व मुलगी राणी यांच्या मदतीने दैनंदिन कामकाज करीत होते. 

बुधवार (दि.१९) सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुलगी राणीस, मला दुधाचा कपआणून दे, तोपर्यंत मी फ्रेश होतो, असे म्हणून पुरुषोत्तम खंडेलवाल बाथरुमला गेले. बराचवेळ झाला तरी वडील बाहेर आले नाही. यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने मुलगी राणीने बाथरुमचा दरवाजा तोडला. यावेळी पुरुषोत्तम खंडेलवाल यानाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. यानंतर राणी यांनी नातेवाईक व छत्तीसगड, ओरीसा व शहरात असलेल्या दोन्ही  बहिणींना वडीलांचे छत्र हरपल्याची माहिती दिली.

पाच मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदापुरुषोत्तम खंडेलवाल यांच्या ओरीसा व छत्तीसगड मध्ये वास्तव्यास असणाऱ्या दोन्ही मुली आज गुरुवारी पहाटे बजाजनगरात पोहचल्या. सर्व पाचही मुली वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी आल्यानंतर नातेवाईक व शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली होती. या पाचही मुलींनी धार्मिक प्रथेला फाटा देत जन्मदात्याच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. तसेच पाचही मुली स्मशानभुमीपर्यंत गेल्या. यानंतर नातू तेजस खंडेलवाल याने आजोबांना अग्नीडाग दिला.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद