शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी आलेल्या लेकीला रस्ता नसल्याने बाळंतपणासाठी पाठवले नातेवाईकांकडे, कोणीच दाद देईना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:49 IST

छत्रपती संभाजीनगरातील लक्ष्मी कॉलनीतील गंभीर प्रकार; समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, राजकारणीही देईना दाद

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : घराचे गेट उघडल्याबरोबर समोर खोल नाला दिसावा, जरा पाय मागे पुढे सरकला तर थेट साधारण १५ फूट खोल नाल्यात पडाल, हा विचारच अंगावर काटे आणणारा आहे. मात्र, या परिस्थितीत गेली ३ महिने लक्ष्मी कॉलनीतील नागरिक राहत आहेत. दोन रस्त्यांना जोडणारा पूल ढासळलेला असतानाही त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. या पुलावर साधारणत: ३० ते ४० घरे अवलंबून आहेत. परिस्थिती इतकी भयावह आहे की, येथील एका कुटुंबाने बाळंतपणासाठी आलेल्या आपल्या लेकीला दुसऱ्या भागात नातेवाइकांकडे पाठवले आहे.

घरातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना नाल्यातून जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे किंवा पर्यायी दूरच्या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. रात्री-अपरात्री कोणी आजारी पडले, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन मार्ग काढवा लागत असल्याची स्थिती आहे.

सप्टेंबरमध्ये कोसळला पूलसातारा परिसरात लक्ष्मी कॉलनीतील गट क्रमांक २०८ मध्ये २०२३ साली यसा नाल्यावर पूल बांधण्यात आला होता. मात्र २८ सप्टेंबर २०२५ रोजी अतिवृष्टीत हा पूल कोसळला. तेव्हापासून परिस्थिती तशीच आहे. पुरुष नाल्यातून ये-जा करतात. मात्र, महिला, वृद्ध आणि लहान मुलांना अनेक अडचणींतून मार्ग काढावा लागतो.

दाद कोणाकडे मागायची?मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही याचा काहीच उपयोग झाला नाही. प्रत्यक्षात पूल बांधण्याचा प्रस्तावही अद्याप पुढे सरकलेला नाही. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडेही नागरिकांनी दाद मागितली. मात्र, तिथेही केवळ आश्वासनच मिळाले. प्रशासन आपली जबाबदारी झटकत असून राजकारणी दुर्लक्ष करत असल्याने या भागातील नागरिक अडचणीत येत आहे. ‘आता जाब तरी कोणाला विचारायचा?’ असा संतप्त सवाल नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

तोंड दाबून बुक्क्यांचा मारआम्ही कर भरतो, गुंठेवारी नियमितीकरणही झाले आहे, तरीही गेले काही महिने घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.- संजय सरकटे, नागरिक

काम होणार नाही का?२५ ते ३० जण मिळून आम्ही पालकमंत्री संजय शिरसाट यांना भेटायला गेलो. तब्बल चार तास वाट पाहिल्यावर भेट झाली. तात्काळ काहीच होऊ शकत नाही एवढेच ऐकायला मिळाले. काहीच होणार नसेल तर तसे स्पष्टपणे सांगावे.- बाबूसिंग राजपूत, नागरिक

महिलांचे जगणेच कठीणपूल ढासळल्यानंतर आम्हा महिलांचे जगणेच कठीण झाले आहे. साधी भाजी आणणे, मुलांना शाळेत सोडणेही धोक्याचे बनले आहे.- दीपिका लाहोट, नागरिक

English
हिंदी सारांश
Web Title : No road for daughter's delivery; family sends her to relatives.

Web Summary : Bridge collapse in Lakshmi Colony, citizens risk lives daily. A pregnant woman was sent to relatives due to the dangerous passage. Repeated complaints to authorities have been ignored, leaving residents frustrated and demanding action.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर