शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

ठरलं! २७, २८ फेब्रुवारीला औरंगाबादेत असणार जी-२० चे शिष्टमंडळ

By विकास राऊत | Updated: January 20, 2023 13:45 IST

संपूर्ण वेळापत्रक ठरले असून जिल्हा आणि मनपा प्रशासन परदेशी पाहुण्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करत आहेत.

औरंगाबाद : जी : २० परिषदे अंतर्गत बैठकीसाठी येत्या फेब्रुवारीच्या २७ आणि २८ तारखेला शिष्टमंडळ औरंगाबादमध्ये असेल. दोन दिवसांत बैठका आणि वेरूळ लेणी सफर असे नियोजन असल्याची माहिती आहे. संपूर्ण वेळापत्रक ठरले असून जिल्हा आणि मनपा प्रशासन परदेशी पाहुण्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करत आहेत.

जी-२० देशांचे शिष्टमंडळ भारतातील काही प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. त्यात राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा समावेश आहे. यानुसार परिषदेनिमित्त राज्यात शिष्टमंडळाचा मुंबईचा पहिला, पुण्याचा दुसरा दौऱ्या झाला आहे. दरम्यान, विदेशी पाहुण्यांचा पाहुणचार व नियोजनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी औरंगाबादचे सहा अधिकारी नुकतेच पुण्याला जाऊन आले आहेत. जी-२० च्या वेळापत्रकानुसार २६ फेब्रुवारीस पाहुणे शहरात येतील. त्यानंतर २७ व २८ फेब्रुवारीस शिष्टमंडळ शहरात असेल.  

पुण्यात दोन दिवसांपूर्वी जी : २० परिषदेंतर्गत अर्थ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मान्यवरांची बैठक पार पडली. या बैठकीला ७० जणांनी हजेरी लावली. उत्तम नियोजन आणि एकदम शिस्तीत हा कार्यक्रम पार पडला. आलेल्या पाहुण्यांचे पुणे प्रशासनाने कसे स्वागत केले, नियोजन कसे होते, यंत्रणांचा सहभाग, समन्वय कसा होता हे पाहण्यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासनातील दोन व मनपाचे चार अधिकारी पुण्याला गेले होते. पुण्यातील नियोजन परफेक्ट होते, असे अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.

असे होते पुण्यात नियोजनपरिषदेसाठी आलेले सर्व पाहुणे एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. हेरिटेज वॉकसाठी जास्त नियोजन नव्हते. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी फक्त अर्धा तास होता. जेवणासाठी केलेल्या व्यवस्थेत प्रत्येक पाहुण्याचे नाव असलेली डिश देण्यात आली होती. ज्या सभागृहात जी : २० परिषदेंतर्गत आर्थिक विषयावर चर्चा होणार होती, तेथे कोणालाही प्रवेश नव्हता. प्रशासकीय अधिकारी बाहेरच होते. पालकमंत्री व इतर मंत्री शेवटच्या रांगेत होते. बैठकीसाठी मॅग्नेटिक आयकार्ड तयार केले होते. त्यामुळे कार्ड असलेल्यांनाच बैठकीला प्रवेश होता. असे बारकावे औरंगाबाद जिल्हा व मनपा प्रशासनाने पुण्यात टिपले. त्याचा फायदा औरंगाबादमधील नियोजनासाठी होणे अपेक्षित आहे.

७० कोटींतून सौंदर्यीकरणाची कामेशहरातील विविध भागातील संरक्षण भिंतींवर आकर्षक चित्रे काढण्यात येत आहेत. ज्या मार्गावरून विदेशी पाहुणे जाणार आहेत. ते सर्व रस्ते गुळगुळीत करण्याचे काम सुरू आहे. तर शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख पर्यटनस्थळे अतिक्रमणमुक्त करून सुशोभीकरणावर भर दिला आहे. महापालिका ५० तर बांधकाम विभाग २० कोटींतून काम करीत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद