शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘फूड व्हॅन’च्या प्रस्तावास निवडणुकीचा ‘ब्रेक’ लागल्याने बचत गटांचा हिरमोड

By विजय सरवदे | Updated: May 2, 2024 19:18 IST

सव्वा कोटीच्या या प्रस्तावाचा विचार निवडणुकीनंतर होऊ शकतो, असा अंदाज

छत्रपती संभाजीनगर : बचत गटांना ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन मावळत्या आर्थिक वर्षात बारगळले आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव आता लांबणीवर पडला. दरम्यान, मार्च अखेरपूर्वी ‘फूड व्हॅन’ मिळेल, व्यवसायाची भरभराटी होईल, या आशेने देव पाण्यात ठेवून बसलेल्या बचत गटांचा मात्र पुरता हिरमोड झालाय. तरीही सव्वा कोटीच्या या प्रस्तावाचा विचार निवडणुकीनंतर होऊ शकतो, असा अंदाज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सूत्रांनी बांधला आहे.

मागील सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी जिल्ह्यातील १६ बचत गटांना खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्याचा नावीन्यपूर्ण प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरीही दिली व १ कोटी २० लाखांचा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीसमोर सादर केला. यात दोन प्रभागसंघ आणि १४ ग्रामसंघांचा सहभाग आहे.

जिल्ह्यात १८ हजार ३८१ महिला बचत कार्यरत आहेत. तथापि, गाव व परिसरातील बचत गटांना व्यवहारात पारदर्शकता आणणे, सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा व्यवहार स्वतंत्र राहावा तसेच उत्पन्न व खर्चाचे मूल्यांकन करणे, अंदाजपत्रकावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामसंघ स्थापन करण्यात आले आहेत. एका ग्रामसंघात गावातील २० ते २५ बचत गटांचा समावेश आहे. याशिवाय, जि. प. गट अथवा मतदारसंघातील बचत गटांवरील संनियंत्रणासाठी प्रभागसंघही स्थापन करण्यात आले आहेत. एका प्रभागसंघात जवळपास १० ग्रामसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यात असे ८०३ ग्रामसंघ व ४२ प्रभागसंघ कार्यरत आहेत.

खाद्यपदार्थांना चांगली मागणीबचत गटांकडून वेगवेगळ्या पद्धतीची लोणची, चटण्या, कुरडया, पापड याप्रमाणे खाद्यपदार्थ तयार केले जात असून, त्यास नागरिकांची चांगली मागणी अनेक प्रदर्शनातून दिसून आली आहे. हे लक्षात घेऊनच मुख्य कार्यकारी अधिकारी मीना आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सिरसे यांनी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत बचत गटांना ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्याची संकल्पना आखली आहे. आठवडी बाजार, यात्रा, एमआयडीसीतील गजबजलेले चौक, शहर किंवा गर्दीच्या ठिकाणी या ‘व्हॅन’ उभ्या करून तेथे नास्ता, चहा, जेवण आदी खाद्यपदार्थांची विक्री केली जाणार आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न