शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामासाठी जायकवाडीतून पहिले आवर्तन सोडले; शेतकऱ्यांमध्ये आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 18:35 IST

छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्ह्यातील पिकांना होणार फायदा...

- संजय जाधव पैठण: रब्बी हंगामासाठी मोसमातील पहिले आवर्तन जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी सायंकाळी ४ वा सोडण्यात आले. १०० क्युसेक्स क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. रब्बी पिकासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जायकवाडी धरणात सध्या ४५.५६% जलसाठा असून रब्बी हंगामासाठी शुक्रवारी पहिली पाळी सोडण्यात आली आहे. १०० क्युसेक्सने सुरू केलेल्या विसर्गात हळूहळू वाढ करून २००० क्युसेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. सदर रब्बी पाळीचे पाणी २५ दिवस सुरू राहणार आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पुढील दोन पाळ्या बाबत निर्णय घेतला जाणार आहे. रब्बी पाळिचे पाणी परभणी जिल्ह्यातील कालवा साखळी क्र. किमी १२२ पर्यंत जाते. हंगामातील पहिले आवर्तन सोडताना विशेष काळजी घ्यावी लागते. सुरवातीला कमी क्षमतेने पाणी सोडून कालव्याची चाचणी घेतली जाते. शेवटपर्यंत विनासयास पाणी पोहचल्यानंतर विसर्गात हळुहळू वाढ करण्यात येते. दरम्यान कालव्यास कुठे गळती लागलेली असल्यास दुरूस्ती करण्यात येते असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.

जायकवाडीच्या डाव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील १२०००० हे. सिंचन क्षेत्रासाठी जवळपास १७०  दलघमी पाणी २५ दिवसात धरणातून सोडण्यात येणार आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, बाजरी, तूर,हरभरा या पिकासह फळबागासाठी कालव्यातून सोडलेले पाणी लाभदायक ठरणार असल्याने जायकवाडी लाभक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, जालना, व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे. 

रब्बी हंगामात तीन तर उन्हाळ्यात पाच आवर्तनेधरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यातून रब्बी हंगामात तिन तर  उन्हाळी हंगामात पाच आवर्तने दिले जातात. जलाशयातून एकूण ११४८ दलघमी पाण्याचा वापर केला जातो. परंतु यंदा पिकांची परिस्थिती व उपलब्ध जलसाठ्या नुसार जायकवाडी प्रशासनास पुढील पाणीपाळीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

डावा कालव्यावर १४१६४० हे.सिंचनजायकवाडी धरणाच्या २०८ कि मी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १४१६४० हे. क्षेत्र सिंचना खाली येते यात छत्रपती संभाजी नगर - ७६२० हे,  जालना - ३६५८० हे,  परभणी - ९७४४० हेक्टर क्षेत्र येते या क्षेत्रातील पिकांना फायदा होणार आहे. 

उजव्या कालव्यातूनही पाणी सोडाउजव्या कालव्यावर ४१६८२ हे क्षेत्र सिंचनाखाली येते. जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि मी लांबीचा  आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यात छत्रपती संभाजी नगर - १४३२ हे,  बीड - ३७९६० हे, व अहमदनगर - २२९० हे क्षेत्रातील पिकांसाठी पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रJayakwadi Damजायकवाडी धरण