शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयातील आकडे चिंताजनक, पण का आहे ही परिस्थिती ?

By संतोष हिरेमठ | Updated: October 6, 2023 17:28 IST

रुग्णालयावर वाढला भर, सोयी-सुविधा मात्र पडताहेत अपुऱ्या

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ रुग्णांचा मृत्यू झाला. हे आकडे चिंता व्यक्त करणारे आहेत. प्रत्येक मृत्यूसाठी वेगवेगळे कारण आहे. मात्र, घाटी रुग्णालयात ही परिस्थिती का येत आहे, यावर विचारमंथन करण्याची वेळ आली आहे, असे घाटीतील डाॅक्टरांनीच सांगितले.

घाटी रुग्णालयात मंगळवारी अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय कल्याणकर, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड, सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. सुधीर चौधरी यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. यावेळी घाटीतील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.एक हजार रुग्णांमागे नऊ रुग्णांचा मृत्यू ही सामान्य बाब आहे. दोन हजार रुग्णांमागे १८ पेक्षा अधिक मृत्यू झाले तर काही तरी चुकते, असे गृहित धरावे. घाटीत २४ तासात १४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे घाटीतील मृत्यूची स्थिती तशी नियंत्रणात असल्याचे बैठकीत घाटीतील डाॅक्टरांनी म्हटले.

घाटीतील डाॅक्टरांनी मांडलेली स्थिती- १,१७७ खाटा, प्रत्यक्षात दोन हजारांपर्यंत रुग्ण भरती राहतात.- क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण. कोणालाही नाकारले जात नाही.- मनुष्यबळ मंजूर खाटांनुसार. त्यातही अनेक पदे रिक्त.- घाटी टर्शरी केअर सेंटर आहे. येथे गंभीर रुग्ण येणे अपेक्षित. परंतु, सामान्य रुग्णांचाही भार आहे.- ग्रामीण भागासह मराठवाड्यातून गंभीर रुग्ण घाटीत रेफर.- खासगी रुग्णालयात मृत्यू नको, म्हणून गंभीर रुग्ण शेवटच्या क्षणी घाटीत रेफर.- जिल्हा रुग्णालय, महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपुरी असल्याची ओरड.- सामान्य प्रसूतीचा भारही घाटीवरच. रोज ५० ते ७० प्रसूती.- महापालिका आरोग्य विभागाच्या रुग्णालयात वर्षभरात जेवढ्या प्रसूती होतात, तेवढ्या प्रसूती घाटीत एक-दोन दिवसांत.- जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी हातभार लावावा. त्यातून घाटीवरील भार कमी होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी