शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

शौर्य पर्व! कारगिलचा रणसंग्रामात मराठवाड्याच्या शूरवीरांची अतुलनीय, वीरश्रींची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 16:50 IST

कारगिल विजय दिवस २६ जुलै: विजयाच्या क्षणाचे साक्षीदार झालेल्या जवानांनी सांगितला युद्धाचा थरारक अनुभव

- प्राची पाटीलछत्रपती संभाजीनगर : ‘थरारक पर्वतीय भाग, हिमवृष्टी, ऑक्सिजनची कमतरता आणि सातत्याने सुरू असलेला गोळीबार. झाडाच्या फांद्या घेऊन आम्ही वरती चढत होतो. इतक्यात पाकिस्तानच्या एका भीषण स्फोटाने एका जवानाच्या पायाचा चुराडा झाला. आम्ही हादरलो. पण, तो मात्र ठामपणे म्हणाला, ‘मला इथेच सोडा. तुम्ही पुढे जा. मला काही होणार नाही.’ कारगिल युद्धात लढलेल्या मराठवाड्यातील जवानांनी ‘लोकमत’शी बोलताना रणांगणातील आठवणी जिवंत केल्या. प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले.

विजयाचा क्षणबटालियन १०६ इंजिनिअर्समध्ये असलेले सैनिक संजय साबळे सांगतात, दर मिनिटाला पाकिस्तानचा बॉम्ब वर्षाव सुरू होता. डोंगर फोडून रस्ता बनवण्याचे काम आमच्याकडे होते. दिवसभर जीव मुठीत घेऊन दगड फोडायचो, तंबूही जळून खाक झाला. रात्रीच्या वेळी मृत सहकाऱ्यांची शरीरे खाली आणताना काळीज तुटायचे. जिथून काही मिनिटांपूर्वी आम्ही गेलो त्या ठिकाणी बॉम्ब पडला. अगदी थोडक्यात आम्ही बचावलो. जेव्हा तिरंगा उंच फडकताना पाहिला, विजयी क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आमच्या युनिटला सायटेशन मेडल मिळाले, ही त्यांच्या असीम धैर्याची ओळख होती.

क्षणाक्षणाला मृत्यूसिग्नल ऑपरेटर सुदाम साळुंखे म्हणाले, दरास खाडीला ज्या सैनिकांनी घेरले त्या ८० जणांच्या ग्रुपमध्ये मी होतो. पाक सैन्याला ठार करून टेकडी ताब्यात घेण्याचे टास्क आमच्याकडे होते. २१ दिवसांत आम्ही ते पूर्ण केले. आमचे अनेक जवान शहीद झाले. पाकिस्तानकडून सातत्याने गोळ्या, बॉम्बचा वर्षाव सुरू होता. झाडाच्या फांद्यांचे आवरण करून आम्ही चढाई करायचो. जवान जखमी होत होते. पण, त्यांना सोडून पुढे जावे लागायचे. रणभूमीतून जिवंत परतलो हे आमचे नशीबच.

२१ व्या वर्षी युद्धभगवान बोरमळे म्हणाले, मी २१ वर्षांचा होतो. १०६ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये पूल, बंकर्स, हेलिपॅड, रस्ते आम्ही सगळे बनवले. शेवटचे ८ दिवस आठवले की अंगावर काटा येतो. जीव मुठीत घेऊन डोंगर चढत होतो. मृत सहकाऱ्यांचे तुकडे गोळा करत होतो. कोणाचा हात, कोणाचा पाय काही ओळखण्यासारखे नव्हते. देशात दिवाळी साजरी होत होती आणि आम्हाला जेवायलाही मिळत नव्हते. बर्फाच्छादित भूमीवर जे आम्ही अनुभवले ते शब्दात सांगता येणार नाही.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडा