शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘अब मैं तुझे बताता हूँ' धमकी खरी ठरली; तरुणाच्या खांद्यात खुपसलेला चाकू थेट पाठीतून बाहेर

By सुमित डोळे | Updated: January 6, 2024 12:16 IST

मोठ्या भावाने वाद मिटविण्यासाठी बोलावले; पण 'छोटू'ने तरूणावर थेट चाकूने वार करत केला खून

छत्रपती संभाजीनगर : चार दिवसांपूर्वी बायजीपुऱ्यात राहणाऱ्या साजेब खान शकील खान व इक्रार उर्फ छोटू मतीन खान या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हापासून छोटूच्या मनात राग धुमसत होता. तेव्हाच त्याने साजेबला ‘अब मैं तुझे बताता हूँ' अशी धमकी दिली. शुक्रवारी इक्रानच्या भावाने वाद सोडवण्यासाठी साजेबला दुपारी ४ वाजता हॉटेलमध्ये बोलावले. मित्राच्या उपस्थितीत ते बोलत असतानाच छोटू तेथे गेला. परिणामी, त्यांच्यात पुन्हा वाद पेटला व छोटूने चाकू काढून साजेबच्या खांद्यात खुपसला. वार इतका जबर होता की, चाकूचे टोक थेट पाठीतून बाहेर निघाले. यात साजेबचा मृत्यू झाला.

आयटीआयचा विद्यार्थी असलेला साजेब व छोटूमध्ये अनेक दिवसांपासून छोट्या-मोठ्या कारणांवरून खटके उडत होते. चार दिवसांपूर्वी छोटूने शिवीगाळ केल्याने त्यांच्यातले वाद हाणामारीपर्यंत पोहोचले. छोटूच्या मनात तेव्हापासून साजेबविषयी राग वाढला होता. गुरुवारी त्याने अन्य मुलांकडे साजेबचा ठावठिकाणा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वाद वाढण्याची शक्यता जाणवल्याने छोटूचा मोठा भाऊ अबरारने वाद मिटवण्यासाठी मित्र सय्यद फैजल सय्यद शायकत (रा. अल्तमश कॉलनी) याच्यासोबत शुक्रवारी भेटण्याचे ठरवले होते.

छोटूला सहभागी करणे टाळले; पण..अबरार, साजेब, फैजल शुक्रवारी दुपारी ४ वाजता हॉटेल पटेल येथे चहा पिण्यासाठी भेटले. 'छोटू आया तो मॅटर बढेगा' असे म्हणत त्यांनी त्याला सहभागी करणे टाळले. ही बाब कळताच छोटू हॉटेलमध्ये गेलाच. अबरार त्याची समजूत घालत असताना छोटूने पुन्हा साजेबकडे रागाने पाहत शिवी हासडली. साजेबने त्यावर आक्षेप घेताच छोटूने चाकू खुपसला. फैजलने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करताच छोटूने त्याच्या हाताची बोटे कापण्याचा प्रयत्न केला. यात फैजलही जबर जखमी झाला.

नशेखोरीवर गंभीर प्रश्नसाजेब रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. यामुळे एकच हलकल्लोळ उडाला. खुनाची घटना कळाल्याने मोठा जमाव जमला. साजेबला एमजीएम रुग्णालयात नेले गेले. डाॅक्टरांनी रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न सुरू करून पंपिंग सुरू केली. मात्र, त्याच दरम्यान साजेबचा मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, रावसाहेब काकड यांनी धाव घेतली. तोपर्यंत मारेकरी पळून गेला होता. या सगळ्यात हॉटेलमध्ये रक्त उडाल्याने चालकाने ते रक्तच पुसून टाकले. यामुळे हॉटेलचालकाला पोलिसांनी रात्री ठाण्यात नेऊन बसवले होते. नव्या वर्षात शहरातील पहिल्याच खुनाने जिन्सीत खळबळ उडाली. छोटूदेखील नशेच्या आहारी गेलेला असल्याने पुन्हा एकदा नशेखोरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद