शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात हिरवळीचं स्वप्न साकार; कातपूरमध्ये १ लाख २७ हजार झाडांची घनदाट वनरचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 19:32 IST

निसर्ग वाचवण्याचं आणि भविष्यासाठी हिरवळ उभारण्याचं हे एक प्रेरणादायी पाऊल ठरलं आहे.

छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यातील मौजे कातपूर येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने अरण्यम घनवन प्रकल्प यशस्वीरीत्या साकारण्यात आला आहे. अवघ्या ४.२५ हेक्टर क्षेत्रात तब्बल १ लाख २७ हजार ५०० रोपांची वृक्ष लागवड करून एक देखणं जंगल येथे उभं राहिलं आहे. निसर्ग वाचवण्याचं आणि भविष्यासाठी हिरवळ उभारण्याचं हे एक प्रेरणादायी पाऊल ठरलं आहे.

सन २०२१ पासून सुरु असलेल्या या प्रकल्पामुळे कातपूर परिसरात जैवविविधतेचं नंदनवन फुललं आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प परिसरामध्ये वृक्ष लागवड करून पशुपक्षांसाठी अधिवास निर्माण करणे हा होता. झाडांची गर्द सावली, पक्ष्यांचा गानगोष्टींनी भरलेला आसरा आणि शुद्ध हवा उन्हाळ्याच्या तप्ततेतही या घनदाट हरित जंगलात मनाला उभारी देणाऱ्या या प्रकल्पाचं सादरीकरण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत पार पडलं. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) उमाकांत पारधी, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन  अधिकारी कीर्ती जमदाडे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, वुई फॉर एन्व्हायरमेंट सामाजिक संस्थेच्या मेघना बडजाते यांची उपस्थिती होती.

मियावाकी ते अरण्यम, दुर्मिळ वनस्पतींचा खजिनानाविन्यपूर्ण प्रकल्पअंतर्गत तीन वर्षात जिल्हा प्रशासनाने जायकवाडी पाटबंधारे कॉलनीच्या उत्तर बाजूस नारळीबाग मौजे कातपूर येथे अरण्यम हे घनवन साकारले आहे. जपानी वैज्ञानिक अकिरा मियावाकी यांच्या तंत्रावर आधारित अरण्यम पद्धतीने सुमारे ३०९ स्थानिक व दुर्मिळ प्रजातींच्या झाडांची येथे लागवड झाली आहे. त्यात अर्जुन, ब्रह्मवेली, तेजपत्ता, रुद्राक्ष, कृष्णकमळ, चाफा, लाल चंदन, साग, बदाम, जांभूळ, मोहगणी, ड्रॅगन फ्रुट अशा दुर्मिळ, औषधी व पर्यावरणीय दृष्टिकोनातून उपयुक्त झाडांचा समावेश आहे. या उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २१.९६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. यामध्ये प्रत्येक रोपावर सरासरी १७२ रुपये खर्च आला. या गुंतवणुकीतून केवळ हिरवाईच नाही, तर भविष्यातील जैविक संपत्तीचाही पाया रचण्यात आला आहे.

संशोधन, पर्यटन आणि निसर्गसंवर्धनाचा त्रिवेणी संगमया घनवनातून जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरणीय जागरुकता, पक्षी अधिवास निर्मिती तसेच विद्यार्थ्यांसाठी संशोधन परिसर उपलब्ध झाला आहे. भविष्यात हे ठिकाण पर्यटनस्थळ, वृक्षप्रजाती संग्रहालय आणि पर्यावरण शिक्षण केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी संधी आहे. दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या वृक्षप्रजातींची  जीन बँक या ठिकाणी तयार होत असून संशोधनासाठी विद्यार्थ्यांना येथे वाव असणार आहे,असे सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी  कीर्ती जमदाडे यांनी सांगितले. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरforest departmentवनविभाग