शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धडाकेबाज आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

By विकास राऊत | Updated: June 27, 2023 12:47 IST

साधी राहणीमान आणि लोकांत मिसळणारा आयएएस अधिकारी म्हणून लोकप्रिय; सेवेचे अडीज वर्ष बाकी असताना घेतली व्हीआरएस

छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केलेला अर्ज शासनाने आज मंजूर झाला आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या केंद्रेकर यांनी अचानक व्हीआरएस घेतल्याने नागरिक तसेच प्रशासनात आश्चर्य व्यक्त होत आहे. 

विभागिय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शेतकरी कुटुंब पाहणीअंती त्यांनी दोन हंगामात १० हजार एकरी मदत शेतकऱ्यांना देण्याचं मत व्यक्त केले होते, यावरून सरकार व सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याचे बोलले गेले. दरम्यान त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये ते आयुक्त म्हणून रुजू झाले होते. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी कोर्टाने देखील ३० जून २०२३ पर्यंत त्यांची बदली रोखली होती.

आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर सध्या विभागीय आयुक्त आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतला होता. केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले. 

मला "माननीय' म्हणू नका साधी राहणीमान आणि लोकांत मिसळून काम करणारे, कोणत्याही दबावाला बळी न पडणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. मागील वर्षी कामानिमित्त खुलताबाद येथे गेले असता पत्नीसह त्यांनी बाजार केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. अगदी खांद्यावर पिशवी घेऊन केंद्रेकर यांनी बाजार केला होता. दरम्यान, त्यांनी पुणे येथे कृषी आयुक्त असताना, मला माननीय, सर वगैरे म्हणू नका, अशी भूमिका घेत तसे परिपत्रकच काढले होते. अधिकारपदामुळे मिळणारी "विशेष प्रतिष्ठा' नाकारण्याचे धाडस नाकारणारा, लोकांची नेमकी अडचण ओळखणारा अधिकारी अधिक काळ जनसेवेत राहावा अशी भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय