शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या नव्या 'इन-आऊट' गेटचे बांधकाम अखेर पाडणार

By योगेश पायघन | Updated: December 8, 2022 16:47 IST

विद्यापीठ गेटचे इंडिया गेटच्या धर्तीवर संवर्धन, नामविस्तार दिनापर्यंत सुशोभिकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न

औरंगाबाद - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणासोबत नवे प्रवेशद्वार उभारण्यात येत होते. मात्र, त्याला होणाऱ्या वाढत्या विरोधामुळे या नव्या 'इन-आऊट' गेटचे बांधकाम काढून घेण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी विद्यापीठ प्रशासन पत्रव्यवहार करून वास्तुविशारदासोबत चर्चेअंती यासंबंधीचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक संदर्भ आहेत. तसेच या प्रवेशद्वाराशी आंबेडकरी जनतेच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. या प्रवेशद्वाराचे संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम विद्यापीठाने हाती घेतले. गेटच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. सुरक्षा भिंती, बाजूच्या दोन्ही रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, सुरक्षा गेट आणि सुशोभीकरणाचे काम विद्यापीठ नामविस्तार दिनापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दिल्ली येथील इंडिया गेटच्या धर्तीवर विद्यापीठातील या गेटचे सुशोभिकरणाच्या या प्रकल्पासाठी सुमारे २ कोटींचा खर्च केला जात आहे.

सुशोभिकरणासोबत प्रवेशद्वाराच्या मधून ऐवजी आता दोन्ही बाजूने ये-जा करावी लागणार आहे. त्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. विद्यापीठात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन-आउट गेटची उभारणी सुरू आहे. त्या गेटच्या दोन्ही बाजून पाण्याचे कारंजे प्रस्तावित आहे. इन आऊट गेटच्या ३ टाॅवरची उभारणी पूर्ण होत आलेली असतांना हे प्रतिगेट होत असल्याचे म्हणत आंबेडकरी संघटनांकडून त्याला विरोध दर्शविला गेला. तर काही संघटनांनी समर्थनही केले. मात्र, गेल्या आठवड्यापासून विरोध वाढल्याने अखेर या गेटचे बांधकाम थांबवण्यात आले आहे.

गेटचे बांधकाम काढून घेऊ विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे पावित्र्य जपण्यासाठी व संवर्धासोबत सुशोभिकरणासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यातील इन-आऊट गेटला विरोध होत आहे. सुरूवातीला एका गटाने समर्थन केले आता पुन्हा विरोध वाढल्याने काम थांबवले आहे. बांधकाम विभागाला पत्र देवू. तसेच वास्तुविशारदासोबत चर्चा करून गेटचे बांधकाम काढून घेवू.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद