शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साऊथ इंडियन रेस्टॉरंटमधील चटणी 'मद्रासी' नारळामुळे बनते खास; किलोवर मिळतो हा नारळ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 3, 2023 11:51 IST

विशेष म्हणजे हे नारळ मद्रास (चेन्नई) हून नव्हे, तर कर्नाटकातून येतात

छत्रपती संभाजीनगर : रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये विशेषत: साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जो वडा, इडली दिली जाते, त्यासोबत गरमागरम सांबार आणि चविष्ट चटणी दिली जाते, त्याला रुचकर करण्याचे काम खास ‘मद्रासी नारळ’ करत असताे. आठवड्याला एक ट्रकभर मद्रासी नारळ खास यासाठीच लागत असल्याचे समोर आले आहे. मद्रासी नारळ म्हटले की, तुम्हाला तामिळनाडूहून हे नारळ येत असतील, असे वाटले असेल; पण तसे काही नाही. कारण हे नारळ मद्रास (चेन्नई) हून नव्हे, तर कर्नाटकातून येतात. या नारळांचा मद्रास शहराशी काही संबंध नाही.

कसे असतात मद्रासी नारळएरव्ही आपण देवाला अर्पण करतो किंवा घरी खाण्यासाठी नेतो, त्या नारळाला साल असते. मात्र, मद्रासी नारळाची साल काढून टाकलेली असते. ज्यास बोडखा नारळही म्हणतात. कोणी या नारळाला बॉम्बे गोटा असेही म्हणतात. याचे खोबरे थोडे जाड असते.

रेस्टॉरंटमध्ये का वापरतात मद्रासी नारळ?नारळ सोलून काढण्यासाठी रेस्टॉरंटवाल्यांकडे वेळ नसतो. त्यांना नारळ आले की, ते खोबऱ्याचे लगेच बारीक तुकडे करून सांबार व चटणीसाठी वापरतात. खोबऱ्याचीच चटणी केली जाते. सोलण्याचे कष्ट नाही आणि जाडसर खोबरे असल्याने सांबारसाठी उत्कृष्ट असतो.- किशोर शेट्टी, रेस्टॉरंट मालक.

किलोने विकतो मद्रासी नारळआपण एरव्ही जो नारळ घेतो तो नगाने विकला जातो; पण मद्रासी नारळ किलोने विकला जातो. साधारणत: मोठ्या नारळाचे वजन ७०० ते ८०० ग्रॅम भरते. रेस्टॉरंटवाले क्विंटलभर नारळ नेत असतात. दर आठवड्याला शहरात एक ट्रक मद्रासी नारळ लागताे. एका ट्रकमध्ये २० हजार नग नारळ येताे. सध्या हा नारळ २८ ते ३० रुपये किलोने विकला जातो.- मुकेश शहा, नारळाचे व्यापारी..

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्नKarnatakकर्नाटक