शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

युनिपोल उभारणीत ४० ठिकाणी पथदिव्यांची केबल तोडली ! मनपाला दहा पत्र, तरीही कारवाई नाही 

By मुजीब देवणीकर | Updated: February 15, 2024 14:55 IST

पथदिव्यांचे काम पाहणाऱ्या बीओटीवरील कंपनीने मनपाच्या विद्युत विभागाला दहा पत्रे दिली.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजकात मोठमोठे जाहिरात फलक (युनिपोल) उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत पोल उभारणीत पथदिव्यांची ४० ठिकाणी केबल तोडण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पथदिव्यांचे काम पाहणाऱ्या बीओटीवरील कंपनीने मनपाच्या विद्युत विभागाला दहा पत्रे दिली. त्यानंतरही कोणतीच ठोस पावले उचलण्यात आली नाहीत.

स्मार्ट सिटी प्रशासनाने प्रो ॲक्टिव्ह या खासगी कंपनीच्या सहकार्याने शहर बससेवेसाठी १२० ठिकाणी थांबे उभारले. हा खर्च कंपनीने त्यावरील जाहिरातींच्या माध्यमातून काढण्याचे ठरले. कंपनी सध्या शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकात मोठमोठे लोखंडी युनिपोल उभारत आहे. पोल उभारणीच्या खड्ड्यामुळे १ फेब्रुवारी रोजी गॅस गळतीची घटना घडली होती. त्यानंतर मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी कंपनीला काम थांबविण्याचे आदेश दिले होते. कंपनीने हे आदेश धुडकावून लावत जिथे फाउंडेशन उभारले होते, तेथे एका रात्रीतून पोल उभे केले.

बुधवारी ‘लोकमत’ने जालना रोडवर, विशेषत: खंडपीठासमोर, न्यायमूर्तींच्या निवासस्थानासमोर कशा पद्धतीने अंधार पडताेय, यावर ‘प्रकाश’ टाकला होता. यानंतर युनिपोल उभारणीत आतापर्यंत ४० ठिकाणी पथदिव्यांची केबल कापण्यात आल्याचे उघडकीस आले. पथदिव्यांची देखभाल करणाऱ्या कंपनीने मनपाच्या विद्युत विभागास पत्र पाठविले; पण मनपाने दखल घेतली नाही. केबल तोडल्यामुळे संपूर्ण रस्त्यांवरील पथदिवे बंद होत आहेत. केबल जोडणीसाठी लाखो रुपये खर्च येत आहे. पथदिव्यांना लागूनच युनिपोल उभारणी केल्याने विरुद्ध दिशेला अंधार पसरतोय. जालना रोडवर काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट तयार झाले. या ठिकाणी अपघाताची भीती आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटीच्या बस व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संजय सुपेकर यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

अनेक प्रश्न अनुत्तरित-स्मार्ट बस थांब्याच्या निविदेत युनिपोल आहेत का.?- सहा वर्षांनंतर ते आता का उभारले जात आहेत.?- बसथांब्यावरील सोयी-सुविधांची पूर्तता का नाही.?- युनिपोलसाठी मनपाच्या मालमत्ता विभागाची परवानगी का नाही?- वाहतूक पोलिस, विद्युत विभागाला का कळविले नाही?- पोल उभारणीसाठी जागा कोणी ठरवल्या?

कारवाई प्रस्तावित करतोयइलेक्ट्रॉन कंपनीने केबल तोडल्यासंदर्भात विद्युत विभागाकडे पत्र दिले आहे. स्मार्ट सिटीच्या कंपनीवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार होत आहे. वरिष्ठ पातळीवरच कारवाईसंदर्भात निर्णय होईल.- फारूख खान, कार्यकारी अभियंता विद्युत, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका