शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

शिंदे-फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती खंडपीठाने उठविली; मंजूर विकासकामे करता येणार

By प्रभुदास पाटोळे | Updated: March 3, 2023 21:12 IST

जालना, अंबड, घनसावंगी आणि वसमत तालुक्यातील विकासकामे सुरू करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील अर्थसंकल्पात जालना, अंबड, घनसावंगी आणि वसमत तालुक्यातील मंजूर केलेली, प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता दिलेली व निविदा प्रक्रियेच्या स्तरावरील कामांना शिंदे - फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. संतोष चपळगावकर यांनी शुक्रवारी (दि. ३) स्थगिती उठविली आणि स्थगित केलेली विकासकामे सुरू करण्याचे आदेश दिले. सदरील आदेश हे संपूर्ण राज्यास लागू नसून, केवळ या रिट याचिकेमध्ये आव्हानित केलेल्या कामांपुरतेच लागू असल्याचे ॲड. संभाजी टोपे यांनी सांगितले.

वसमतचे आमदार राजू नवघरे, जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश टोपे, पूजा कल्याण सपाटे आदींनी ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत याचिका दाखल करून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या निधीनुसार कामे व्हावीत, अशी विनंती केली होती. ती खंडपीठाने मंजूर केली आहे. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या काही कामांना स्थगिती दिली होती. निविदा पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश दिलेल्या विकासकामांना स्थगित करण्यात येऊ नये, असे खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीवेळी बजावले होते. त्यानंतर संबंधित कामांचा शासन स्तरावर आढावा घेतला जात आहे, असे निवेदन शासनाकडून करण्यात आले होते.

खंडपीठात ५ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी बऱ्याचशा कामांवरील स्थगिती उठवण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, याचिकाकर्त्यांचे वकील संभाजी टोपे यांनी स्थगिती उठवण्यात आलेली कामे केवळ सत्ताधारी पक्षातील आमदारांची असून, विरोधी पक्षातील लाेकप्रतिनिधींच्या कामांवरील स्थगिती कायम असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. सुनावणीच्या वेळी त्यांनी विविध न्याय निवाड्यांचेसुद्धा संदर्भ दिले.

विकासकामांच्या स्थगितीला घटनेच्या धारा २०४ची बाधाॲड. टोपे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना दोन्ही सभागृहांनी आणि राज्यपालांनी याचिकेत दर्शविलेली विकासकामे मंजूर केली होती. अशा प्रकारे मंजूर केलेली कामे राज्य घटनेच्या धारा २०४ नुसार स्थगित करता येत नाहीत. शासन बदलल्यानंतर शिंदे सरकारने कुठलीही प्रक्रिया पूर्ण न करता मंजूर झालेली कामे सचिवांच्या स्वाक्षरीने स्थगित केली. शासनाच्या कामाच्या नियमानुसार (बिजनेस रुल्स) मोठ्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक असते, याचे पालन झाले नाही.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCourtन्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे