शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पदव्युत्तर परीक्षेत कुलगुरूंसह भरारी पथकांच्या धाडसत्रामुळे निकालाचा टक्का घसरला 

By राम शिनगारे | Updated: August 2, 2025 12:35 IST

अनेक विषयांचा निकाल ५० टक्क्यांहून कमी, तर बहुतांश अभ्याक्रमांचे निकाल ७५ टक्क्यांहून कमी लागले

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये कुलगुरूंसह इतर भरारी पथकांनी कॉपीमुक्तीसाठी धाडसत्र अवलंबिले होते. त्याचा परिणाम निकालांवर झाल्याची आकडेवारी आली आहे. अनेक विषयांचा निकाल ५० टक्क्यांहून कमी, तर बहुतांश अभ्याक्रमांचे निकाल ७५ टक्क्यांहून कमी लागले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मागील वर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत विद्यापीठातील प्राध्यापकांची भरारी पथके नेमली होती. त्यावेळी काही पथकांचा अपवाद वगळता जास्त प्रमाणात कारवाया करण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र, एप्रिल-मे महिन्यात घेतलेल्या चारही जिल्ह्यांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रांना थेट कुलगुरू डॉ. फुलारी यांनीच अचानकपणे भेटी देऊन कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण परीक्षा परफॉर्मन्स रद्द केला. अनुपस्थित प्राचार्यांना ५० हजार रुपये दंड ठोठावला. कुलगुरूंशिवाय परीक्षा संचालक डॉ. डोळे, विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. अभिजित शेळके यांच्या भरारी पथकांनीही कारवाई केली. त्याचे परिणाम निकालात दिसून आले. विद्यापीठाने घेतलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. ७५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले.

या अभ्यासक्रमांचे निकाल घसरलेपदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जाहीर झालेल्या निकालात एम.ए. अर्थशास्त्र विषयाचा निकाल ५७.१४ टक्के लागला आहे. त्याशिवाय एम.ए. इंग्रजी ४९.६६ टक्के, भूगोल ६६.६७, इतिहास ५३.८५, गृहविज्ञान ६६.६७, मराठी ५३.३७. संगीत ६३.६४, मानसशास्त्र ६०, उर्दू ५८.३३, राज्यशास्त्र ६५.७१, एम.एस्सी बायोटेक्नॉलॉजी ६६.६७, बॉटनी ५६.०१, फॉरेन्सिक ॲप्लाइड फिजिक्स ॲण्ड बॅलिस्टिक्स, भौतिकशास्त्र ६९.२३, रसायनशास्त्र ९.८५, एम.कॉम ६३.०५, ई-कॉमर्स विषयाचा निकाल ६० टक्के लागला आहे. ७५ पैकी केवळ एम.ए. आरेबी, वृत्तपत्रविद्या, फाइन आर्ट, एम.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स, हर्बल टेक्नॉलॉजी आणि डीबीएम या एकाच विभागात चालणाऱ्या अभ्यासक्रमांचे निकाल १०० टक्के लागले आहेत, उर्वरित सर्व अभ्यासक्रमांचे निकाल घसरल्याची माहिती संचालक डॉ. डोळे यांनी दिली.

काॅपीमुक्त परीक्षेला प्राधान्यपदव्युत्तर अभ्यासक्रमच नव्हे तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षाही काॅपीमुक्त घेण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार परीक्षा यंत्रणेत बदल करण्यात येत आहेत.-डॉ. बी. एन. डोळे. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यापीठ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र