शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्रतिसाद नसणाऱ्या महाविद्यालयांना विद्यापीठ नोटीस बजावणार

By राम शिनगारे | Updated: March 21, 2024 11:50 IST

कमी सहभाग असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना नोटीस देत, सहभाग का घेतला गेला नाही, याबाबत विचारणा केली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन उत्तरपत्रिका मूल्यांकनात सहभाग न घेणाऱ्या, अत्यल्प सहभाग असलेल्या महाविद्यालयांना नोटीस पाठविणार आहे. यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. वारंवार सूचना देऊनही उत्तरपत्रिका मूल्यांकनास तपासणीच्या कामात प्राध्यापकांचा सहभाग कमी होता. अनेक महाविद्यालयांकडून तपासणीला प्राध्यापकच आले नाहीत, अशा महाविद्यालयांचा परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यात हा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक नुकतीच कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत नोव्हेंबर-डिसेंबर सत्रातील परीक्षेच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. परीक्षेनंतर निकालाची प्रक्रिया लांबली होती. परीक्षांचे निकाल ३० दिवसांत जाहीर होणे अपेक्षित असताना अडीच, तीन महिन्यांनंतर अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. विद्यापीठाअंतर्गत विविध १३५ अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ३ लाख ५३ हजार ७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सत्र परीक्षेत पदवीच्या तुलनेत पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत जाहीर होऊ शकले नाहीत. त्यात आता मूल्यांकनाच्या कामात महाविद्यालयनिहाय सहभागी प्राध्यापकांचा आढावा घेण्यात आला. कमी सहभाग असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना नोटीस देत, सहभाग का घेतला गेला नाही, याबाबत विचारणा केली जाणार आहे. मूल्यांकनासाठी चार जिल्ह्यांत १६ तपासणी केंद्र होती. विद्यापीठ मुख्य परिसरासह उपपरिसरातील केंद्रांचा समावेश आहे.

अनेक महाविद्यालयांत प्राध्यापकच नाहीतविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ४७६ एवढी आहे. त्यापैकी १५७ पेक्षा अधिक ठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग चालतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांना पात्र प्राध्यापक असण्याचा नियम आहे; परंतु अनेक ठिकाणी पात्र प्राध्यापकच नसल्यामुळे महाविद्यालयांकडून मूल्यांकनांसाठी प्रतिसाद मिळाला नाही. मूल्यांकनाच्या कामासाठी संबंधित विषयांच्या प्राध्यापकांना केंद्रांवर पाठविण्याबाबत प्राचार्यांना सुमारे चारवेळा पत्र देण्यात आले. तरीही असंख्य प्राध्यापकांनी मूल्यांकनाच्या कामात सहभाग नोंदविला नाही. त्यामुळे मूल्यांकनाची गती मंदावली. सहभाग कमी, अत्यल्प असलेल्या शंभर महाविद्यालयांना याबाबत समज दिली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण