छत्रपती संभाजीनगर : कोल्हापूरचे कडक हलगी वादन महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. त्याच धर्तीवर यंदा आपल्या छत्रपती संभाजीनगरातील कारागिरांनी ‘झिंगाट हलगी’ व ‘टिल्लू ताशा’ तयार केला आहे. हेच यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण होय.
अर्धा कि.मी.पर्यंत घुमतो हलगीचा आवाजढोल-ताशापेक्षा हलगीचा आवाज कडक असतो. झिंगाट हलगीचा आवाज तर अर्धा कि.मी.पर्यंत घुमतो. १० ते १२ हलगी वादक असतील तर तो नादच एक नंबर ठरतो. २० बाय २० इंच आकारातील ॲल्युमिनियमची रिंग, त्यास सोनेरी रंग, २४ नट-बोल्ट (चावी) अशी ही झिंगाट हलगी काही गणेश मंडळांनी खरेदी केली आहे.
टिल्लू ताशाप्रत्येक ढोल-पथकात एक किंवा दोन चिमुकले ताशा किंवा ढोल वादक आर्वजून असतातच. हे चिमुकले वादनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. खास अशा चिमुकल्यांसाठी ‘टिल्लू ताशा’ बाजारात विक्रीला आला आहे.
बाहुबली ढोलची क्रेझ कायमढोलपथकातील तरुणांमध्ये बाहुबली ढोलची क्रेझ यंदाही कायम असल्याचे दिसून आले. ६० इंची व ६० किलो वजनाच्या बाहुबली ढोलचे वादन केल्यास सुमारे एक कि.मी.पर्यंत दणदणाट ऐकू येऊ शकतो. याशिवाय छोटा भीम ढोल, जम्बो ढोल, सिंघम ढोल, दबंग ढोलही बाजारात असून ८०० ते १० हजार रुपयांपर्यंत हे ढोल विकत आहेत.
तरुणींसाठी हलक्या वजनाचे ढोलप्रत्येक ढोल-पथकात तरुणांच्या बरोबरीने तरुणीही ढोलवादन करीत असतात. अशा लाडक्या बहिणींसाठी खास ३ किलो वजनाचा ढोल तयार करण्यात आला आहे.
जुन्या ढोलची दुरुस्तीबाजारात नवीन ढोल २००० पेक्षा जास्त विक्री झाले आहेत. मात्र, त्यापेक्षा जास्त जुने ढोल दुरुस्तीला आले आहेत, अशी माहिती सय्यद अजम यांनी दिली.