शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम; लहान मुलांनाही संधिवात, तेही वयाच्या दहाव्यावर्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:51 IST

ताप, गुडघ्याला सूज, मूल सुस्त राहणे, मुलांचे खेळणे कमी होणे अशी त्याची लक्षणे आहेत.

औरंगाबाद : संधिवात म्हटला की प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार, असाच समज आहे. मात्र, लहान मुलांमध्येही आता या आजाराचे निदान होत आहे, तेही अवघ्या १ ते १० वर्षांच्या मुलांमध्ये. हा आजार दुर्मिळ नाही; परंतु त्याचे निदान वेळीच होत नसल्याची चिंता बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली.

शहरात आयोजित केलेल्या दोनदिवसीय बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेचा रविवारी समारोप झाला. सकाळच्या सत्रात डॉ. नीती सोनी यांनी, मुले किशोर वयात आल्यानंतर घ्यावयाची काळजी, यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. मुलांमधील स्वमग्नता वेळीच कशी ओळखावी, यावर डॉ. अंजली बेंगलोरे यांनी मत मांडले. डॉ. राजू खूबचंदानी यांनी लहान मुलांमधील संधिवात, यावर केलेले अभ्यासपूर्ण मार्गदर्शन समारोपाप्रसंगीचे महत्त्वपूर्ण सत्र ठरले.

अनुवंशिकता, बदलती जीवनशैली, जेनेटिक या कारणांमुळे मुलांमध्येही संधिवात आढळत आहे. ताप, गुडघ्याला सूज, मूल सुस्त राहणे, मुलांचे खेळणे कमी होणे अशी त्याची लक्षणे आहेत. याचे निदान वेळीच होणे गरजेचे आहे. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची असल्याचे डाॅ. खूबचंदानी म्हणाले.

परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे डॉ. राजेंद्र खडके, समन्वयक डॉ. राजश्री रत्नपारखे, डॉ. रेणू बोराळकर, डॉ. गणेश कुलकर्णी, डॉ. मंदार देशपांडे, डॉ. मंजुषा शेरकर, डॉ. अभिजित परळीकर,डॉ. समीर जोशी, डाॅ. रोशनी सोधी, डाॅ. अभय जैन, डाॅ. प्रशांत जाधव आदींनी परिश्रम घेतले.

तापाची एक नव्हे, अनेक कारणेडाॅ. जी. व्ही. बसवराज म्हणाले, लहान मुलांमध्ये अनेक कारणांमुळे ताप येतो. सर्वसामान्यपणे ३ ते ४ दिवसांपर्यंत ताप बरा होतो. ताप का येतो, याचे निदान करणे गरजेचे असते. मुलांना स्वच्छ पाणी देणे, सकस आहार देणे यासह त्यांचे लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.

तालुका पातळीवर डाॅक्टरांचा सहभागअगदी तालुका पातळीवरील बालरोगतज्ज्ञांना परिषदेत आपले अनुभव आणि मत मांडण्याची, तज्ज्ञांचा अनुभव ऐकण्याची संधी मिळाल्याने ही परिषद मराठवाड्याच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरली, असे डॉ. श्याम खंडेलवाल, डॉ. संध्या कोंडपल्ले म्हणाल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय