शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली ७६ मिनिटांत पार पडणार विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत सोहळा

By योगेश पायघन | Updated: November 16, 2022 18:36 IST

४१४ विद्यार्थ्यांना पीएच.डी करणार प्रदान; शरद पवार, नितीन गडकरींचा डि.लिट ने होणार सन्मान

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. १९) ११ ते १२.१६ वाजेपर्यंत १ तास १६ मिनिटांचा हा सोहळा असेल. पद्मभूषण डॉ. विजय भटकर या सोहळ्यात दीक्षांत भाषण करणार असून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट आणि ४१४ विद्यार्थ्यांना पीएच.डी, एमफिलची पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

हिवाळी २०२० आणि उन्हाळी २०२१ परीक्षासह या काळात पदवी प्राप्त करणाऱ्या पदव्यूत्तर पदवी धारक २ हजार ४८, पदवीधारक १ लाख २ हजार ८०९ जणांना महाविद्यालयात समारंभपुर्वक पदवी प्रदान करण्यात येईल. दीक्षांत समारंभानंतर महाविद्यालयात हे समारंभ आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्यानुसार या सोहळ्यांचे आयोजन महाविद्यालयांनी करावे. आठवडाभरात १२ सेक्यूरीटी फिचर्ससह पदवी प्रमाणपत्राची छपाई पुर्ण होऊन महाविद्यालयांना पाठवण्यात येईल. विद्यापीठ मुख्य परिसरात पदवी, पदव्यूत्तर पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी व एम.फिल पदवीचे वितरण सभारंमाच्या दिवशी परीक्षा विभागातील काउंटरवर मान्यवरांच्या उपस्थितीत पदवी वितरण करण्यात येईल. चारही मान्यवर समारंभाला येणार असल्याचे निश्चित केले असून हा सोहळा ऐतिहासिक व संस्मरणीय ठरेल. असे कुलगुरूंनी सांगितले. पत्रकार परिषदेस प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, परीक्षा मंडळ संचालक डॉ.गणेश मंझा, प्रसिध्दी समिती अध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर, सचिव संजय शिंदे यांची उपस्थिती होती.

थेट प्रेक्षपण अन् विद्युत रोषणाईनाटयगृहात होणाऱ्या दीक्षांत सोहळ्याचे नाटयगृहाच्या बाहेर मंडपातही प्रेक्षपण होईल. तसेच ऑनलाईन थेट प्रक्षेपणही समाजमाध्यमांवर केले जाणार आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वार, नाटयगृह, छत्रपती शिवराय व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात सुभाभिकरण व विद्यूत रोषणाई करण्यात येत आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीEducationशिक्षण