शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

युनिव्हर्सल हायस्कूल दहावी उत्तीर्ण नऊ विद्यार्थ्यांचे टीसी देईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:28 IST

कोराेना काळातील शुल्क बाकी असल्याचा शाळेचा दावा

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा परिसरातील युनिव्हर्सल हायस्कूलमधून दहावीची परीक्षा उतीर्ण नऊ विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट (दाखला) शाळा प्रशासन देत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थ्यांसह पालक शाळेच्या धाेरणामुळे हवालदिल झाले असून, माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना टीसी देण्याच्या सूचना केल्या. मात्र, शाळा प्रशासनाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष केले आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार या हायस्कूलच्या शुल्काविरोधात पालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित पालकांनी २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षातील ६० हजार रुपये शुल्क शाळेला भरलेले आहे. त्याशिवाय शाळेचे शुल्क हे जिल्हा शुल्क नियामक समितीने ठरवावे, असेही आदेशात म्हटलेले आहे. जिल्हा शुल्क नियामक समितीने आणखी शुल्क भरण्यास सांगितल्यास ते सुद्धा देण्याची तयारी पालकांनी दाखवलेली आहे. याविषयी न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना दहावीचे हॉलतिकीट देताना आणि आता टीसी देताना छळ करीत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना टीसी आवश्यक असून, देण्याची मागणी केली आहे. याविषयी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, माहिती घेऊन प्रतिक्रिया कळवितो, असे सांगण्यात आले. त्यानंतर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

शिक्षणाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना पत्रमाध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांना नऊ पालकांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावानिशी पत्र पाठवून संबंधितांस टीसी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, शाळेच्या प्रशासनाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्र