शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

'मुंबई महापालिकेतील टक्केवारीसाठी ठाकरे बंधू एकत्र!'; संजय शिरसाटांचा घणाघाती प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 14:26 IST

ज्यांचा जीव फक्त 'टक्केवारी'त अडकलाय, त्यांना जनतेची काय काळजी?

छत्रपती संभाजीनगर: "ज्या नेत्यांना नगरपालिकेत प्रचारासाठी फिरायला वेळ नव्हता, त्यांचा जीव आज मुंबईत का अडकला आहे? कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. केवळ टक्केवारीच्या स्वार्थासाठी आणि मजबुरीतून ही युती झाली आहे," अशा शब्दांत शिंदेसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संभाजीनगरमध्ये युतीचा पेच कायम? स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील युतीबाबत बोलताना शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. "उपमुख्यमंत्री शिंदेंनी महायुतीचे स्पष्ट आदेश दिले आहेत, मात्र छत्रपती संभाजीनगरमधील काही लोकांना युती नको आहे असे दिसते. चार बैठका होऊनही काहींनी अवास्तव मागण्या केल्या आहेत. आज आम्ही अतुल सावे यांची भेट घेऊन अंतिम चर्चा करू, अन्यथा वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय घेतला जाईल. आम्हाला भांडण उकरून काढायचे नाही, म्हणूनच आम्ही आजवर शांत आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.

खैरे आणि दानवेंवर टीकास्त्रसंजय शिरसाट यांनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचा समाचार घेताना अत्यंत तिखट शब्द वापरले. "ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना उभी राहिली, त्याच पक्षात आता कुणाला तरी जपण्यासाठी 'मामू' होण्याची वेळ आली आहे. अनेकजण आज उबाठा सोडण्याच्या तयारीत आहेत. अंबादास दानवे ज्या एमआयएमच्या मतांवर बोलत आहेत, त्यांनी विचार करावा की अब्दुल सत्तार जेव्हा धनुष्यबाणासाठी लढले, तेव्हा तुमची भूमिका काय होती? आता तुमच्या डब्याला कुलूप लावण्याची वेळ आली आहे," असे शिरसाट म्हणाले.

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/865702496004682/}}}}

उद्धव ठाकरेंची गल्लीत सभा घेण्याची वेळ! मैदान बुकिंग आणि सभांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. "मैदानं बुक करून तिथे लोकं तरी आणा. आता गल्लीत सभा घेण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. आम्ही काय करायचं हे आम्हाला चांगलं कळतं, म्हणूनच आमचा पक्ष पुढे चाललाय. तुमचा डबा रुळावरून घसरला असून आता फक्त काठावर बसून पाहण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय उरलेला नाही," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Brothers Unite for Mumbai Corporation's Percentage: Shirsat's Sharp Attack

Web Summary : Sanjay Shirsat accuses Thackeray brothers of uniting for Mumbai's corporation profits. He criticized Uddhav Thackeray's declining influence and questioned Ambadas Danve's stance on Hindutva and MIM support while expressing confidence in Shinde's leadership.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे