शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

'व्हॅलेंटाईन डे'ला भयंकर घडले; मुलीचे नाव घेत तरुणाने पेटवून घेत जीवन संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:48 IST

Suicide on Valentine’s Day व्हॅलेंटाईन डेला तरुणाने आत्महत्या केल्यामुळे त्याचा प्रेमभंग झाला असावा, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे

ठळक मुद्देशिवशंकर कॉलनीत रविवारी मध्यरात्रीची घटनातरुण १०० टक्के जळाल्याने त्याची ओळख पटेना

औरंगाबाद : संपूर्ण जग व्हॅलेंटाईन डे साजरा करीत असताना रविवारी (दि.१४) मध्यरात्री २० ते २५ वर्षांच्या अनोळखी तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शिवशंकर कॉलनीत घडली. या घटनेत १०० टक्के जळाल्याने तो घटनास्थळीच मरण पावला. यावेळी तो एका तरुणीच्या नावाने ओरडत होता, प्रेमभंग झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.

शिवशंकर कॉलनीतील शिव हनुमान मंदिरामागील गल्लीत एका अनोळखी तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. पेटलेल्या अवस्थेत तो एका तरुणीच्या नावाने ओरडत ओरडत शांत होऊन कोसळला. ही माहिती मिळताच, जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. पोलिसांनी सांगितले की, घटनेपासून सोमवारी रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटलेली नाही. तरुणाचे वय अंदाजे २० ते २५ वर्षे असावे. त्याच्या अंगावर मरून रंगाचा टी शर्ट आणि काळी जिन्स आहे. डाव्या हातावर इंग्रजीत आकाश अक्षर आहे, तर उजव्या हातावर अश्विनी नावाचा टॅटू काढलेला. उजव्या हातातील एका बोटात खड्याची अंगठी आहे. त्याचा मोबाइलचाही या घटनेत जळाला. यामुळे त्याची ओळख पटलेली नाही. या वर्णनाच्या तरुणाला कोणी ओळखत असेल, तर तातडीने जवाहरनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी केले. याविषयी जवाहरनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे तपास करीत आहेत.

प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचा कयासव्हॅलेंटाईन डेला तरुणाने आत्महत्या केल्यामुळे त्याचा प्रेमभंग झाला असावा, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे फौजदार तायडे यांनी सांगितले. त्याने जाळून घेतले, तेव्हा तो मुलीचे नाव घेऊन ओरडत होता, यावरून या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले. हा तरुण कोण होता, याविषयी घटनास्थळावरील गल्लीतील लोकांना माहिती नसल्याचे ते पोलिसांना सांगत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे