शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा

By सुमेध उघडे | Updated: February 19, 2020 13:01 IST

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : उदयोन्मुख गायकाचा कवालीतून शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांवर प्रकाश

ठळक मुद्दे पहिल्यांदाच मराठी कवालीमधून शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभावाची प्रतिमा मांडली आहे.

- सुमेध उघडे 

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचे स्वराज्य हे सर्व जातीधर्मातील जनतेचे स्वराज्य होते. शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदाभेद केला नाही. त्यांना साथ देणारे जसे हिंदू अठरा पगड जातीचे होते, तसेच मुस्लिम मावळेसुद्धा होते. यावर कवालीच्या माध्यमातून शहरातील उदयोन्मुख गायक अजय देहाडे यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.     

ही बारा बलुती जाती अठरा पगड सोबत चालतीमावळे खंबीर शूरवीर गडकिल्ले हे जिंकतीहिंदू-मुस्लिम भेदभावाचा गेला पुसुनी ठसाकल्याणकारी समतेचा जपला त्यांनी वारसासांगा बरं शिवाजी राजा मुस्लिमविरोधी कसा..  

असा सडेतोड सवाल करीत या कवालीतून शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा आपल्या समोर येते. पनवेल येथील गीतकार अमोल कदम यांनी हृदयाचा ठाव घेणाऱ्या शब्दांत पहिल्यांदाच मराठी कवालीमधून शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभावाची प्रतिमा मांडली आहे. आज समाजात जातीपातीवरून द्वेष पसरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांनी गाजवलेले शौर्य पुन्हा एकदा सांगण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने ही कवाली रचली गेली, असे गीतकार कदम सांगतात. कवालीचे संगीत संयोजन उज्ज्वल वळुंजे यांनी केले होते. मुस्लिम मावळ्यांचे वर्णन करताना गीतकार म्हणतात, 

महाराजांच्या सेवेला मदारी मेहतरआरमार प्रमुख दर्यासारंग खंबीर तत्परसेनापती नूरखान बेग सारे जागले इमानासिद्धी इब्राहिम सांभाळतो महाराजांचा तोफखाना वकील काझी हैदर पराक्रमी सिद्धी हिलाल वाघ नखांचा कारागीर रुस्तमे जमाल 

शिवरायांचे आरमार हे इंग्रज, सिद्दी आणि पोर्तुगीजांनादेखील धडकी भरविणारे होते. सामुद्रिक तटबंदी सुरक्षित ठेवण्यासाठी आरमार दलाची कामगिरी महत्त्वाची होती. अशा आरमार दलाच्या प्रमुखपदी शिवरायांनी दौलतखानची नेमणूक केली. शिवरायांकडे अत्याधुनिक तोफखाना होता. इब्राहिमखान हे शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. शिवरायांच्या स्वराज्यात सातशे निष्ठावान पठाणांची फौज होती. शिवरायांच्या स्वराज्याचा पहिला सरनौबत नूरखान बेग होता. घोडदळातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाहवाह होते. शिवाजीराजांच्या अंगरक्षक दलात एकूण एकतीस अंगरक्षक होते. सिद्दी इब्राहिम हे शिवाजीराजांचे अंगरक्षक होते. शमाखान हे शिवरायांचे विश्वासू सरदार होते. मदारी मेहतर हे महाराजांच्या आगरा भेटीच्या वेळी आणि त्यांना तेथून बाहेर काढण्याच्या मोहिमेत अग्रभागी असणारे स्वराज्यनिष्ठ होते. अशा अनेक धाडसी, शूरवीर मुस्लिम मावळ्यांची आठवण या कवालीतून पुढे येते. 

शिवाजी महाराजांची लढाई कोणत्याही जातीधर्माविरुद्ध नव्हती, तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी शिवरायांची तलवार तळपत होती. यावर समाजात अधिक प्रबोधन व्हावे, चर्चा व्हावी यावरच कवालीचा शेवट होतो तो पुढील शब्दांत... 

धर्मविरोधी शिवाजी राजा नका रंगवू आज रे  मानवतेचे स्वराज्य आपले तोच आपला साज रेजानो शिवाजी मानो शिवाजी दिखा दो शिवाजीविचारो का इस जहाँ जो सीखा दो शिवाजी

शिवाजी महाराज आदर्शशिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. त्यांच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा प्रसार होणे अधिक आवश्यक आहे. कवालीचे रेकॉर्डिंग झाले असून, लवकरच ते आपल्या समोर येईल. - अजय देहाडे, गायक- संगीतकार

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंतीAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक