लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: दहावी परीक्षेचा मंगळवारी निकाल घोषित करण्यात आला़ त्यामध्ये लातूर विभागात दरवेळी तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या नांदेडने यंदा दुसरे स्थान पटकावले आहे़ गतवर्षी दहावीत जिल्ह्याचा ७४़४८ टक्के निकाल लागला होता़ यंदा त्यात वाढ होऊन तो ८३़०६ टक्यावर पोहोचला़ तर ४३ शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे़दहावीत जिल्ह्यातील ४८ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता़ त्यापैकी ४८ हजार १७४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली़ त्यातील ३८ हजार १६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ फ्रेश विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८३़०६ टक्के तर रिपीटर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३७़६९ टक्के होते़ या परीक्षेत एकूण ३६ हजार ६३३ फ्रेश तर १ हजार ५३४ रिपीटर विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ लातूर विभागात फ्रेश व रिपीटर मिळून एकूण एक लाख १७ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता़ त्यापैकी १ लाख १६ हजार ७१० विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले़ विभागाचा दहावीचा निकाल ८२़१९ टक्के लागला़ लातूर जिल्ह्याचा ८९़०५, उस्मानाबाद ८२़४८ तर नांदेड जिल्ह्याचा निकाल ८३़०६ टक्के लागला आहे़ दरम्यान, दुपारी दीड वाजता आॅनलाईन निकाल लागल्यानंतर तो पाहण्यासाठी शहरातील इंटरनेट कॅफेवरच विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती़ बारावीनंतर आता दहावीच्या निकालातही जिल्ह्याचा टक्का वाढला आहे़
दहावीत नांदेडचा टक्का वाढला
By admin | Updated: June 14, 2017 00:29 IST