शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाच्या डोक्याला ताप; दहावीच्या मूल्यांकनात शाळांकडून चुकांचा भडिमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 16:38 IST

SSC Results : मूल्यांकन २१ जूनपासून ऑनलाईन भरण्याचे वेळापत्रक होते. २४ जूनला शिक्षण मंडळाची संगणकीय प्रणाली सुरळीत सुरू झाली.

ठळक मुद्देबोर्डाकडून ३ दिवस मुदतवाढीची विनंतीया विद्यार्थ्यांचे निकाल रखडणार...

- योगेश पायघनऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडिमार केला आहे. त्या चुकांची दुरुस्ती करता-करता नाकीनऊ आल्याने विभागीय शिक्षण मंडळाकडून पुढे ३ दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे.

इयत्ता नववी व दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल लागणार आहे. हा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागेल, असे सुरुवातीला सांगण्यात येत होते. त्यानंतर १५ जुलैपर्यंत निकाल लागेल, असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, शाळांनी असंख्य चुका निकाल भरताना केल्या आहेत. त्यांची दुरुस्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया आणखी वेळखाऊ होऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मूल्यांकन २१ जूनपासून ऑनलाईन भरण्याचे वेळापत्रक होते. २४ जूनला शिक्षण मंडळाची संगणकीय प्रणाली सुरळीत सुरू झाली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी ३० जूनपर्यंतची मुदत २ दिवस वाढविल्याने २ जुलैपर्यंत हे काम चालले. त्यानंतर दुरुस्ती, विषय बदल, त्रुटी आदी कामे सध्या बोर्डाच्या ईडीपी विभागाकडून सुरू आहेत.

मुदतवाढीची विनंती केलीनिकाल भरल्यावर निश्चिती केली नाही. श्रेणी व्यवस्थित टाकली नाही. माध्यमांतील बदल केला. संपूर्ण शाळा राखीव ठेवली. आता पूर्ण शाळेचे गुण बोर्डाला भरायचे आहेत. अशा असंख्य चुका आहेत. चुकांचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्यानुसार त्यांच्या दुरुस्त्यांची संख्याही वेगवेगळी आहे. त्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नऊ जुलैपर्यंत मुदत होती. ती आम्हाला १०, ११, १२ जुलैपर्यंत किमान तीन दिवस वाढवून हवी आहे, असे विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव आर. पी. पाटील यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांचे निकाल रखडणार...विभागीय शिक्षण मंडळात दहावीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ७७ हजार ७६२ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५६० विद्यार्थ्यांचा निकाल अंतिम केलेला नाही. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात ६०१ जणांच्या निकालाची निश्चिती झाली नाही, तर ९७ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे अपूर्ण व निकाल निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी शाळांवर आली आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांचे करायचे काय, याबद्दल मुदतवाढ मिळाली नाही. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी