औरंगाबाद : चार दिवसांत जिल्ह्यात पन्नासपेक्षा अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारांचा फटका बसला असून, त्यात शेतीचे सुमारे दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात चार दिवसांपासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले की, सिल्लोड, कन्नड आणि खुलताबाद या तीन तालुक्यांत अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तीन तालुक्यांत सुमारे पन्नास ते साठ गावांना याचा जास्त फटका बसला आहे. या गावांमधील नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. तरीही सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या गावांमध्ये ५३ जनावरे दगावली आहेत. तसेच एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला आहे. १६९ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली आहे.
दहा हजार हेक्टरच्या नुकसानीचा अंदाज
By admin | Updated: April 14, 2015 01:06 IST