शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
2
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
3
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
4
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
5
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
6
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
7
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
8
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
9
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
10
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
11
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
12
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
13
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
14
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
15
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
16
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
17
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
18
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
19
Tanya Mittal : "कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
20
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
Daily Top 2Weekly Top 5

झटपट श्रीमंत होण्याच्या मोह अंगलट; दुप्पट बिटक्वॉईनच्या आमिषाने व्यापाऱ्याने १० लाख गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 13:47 IST

Bitcoin fraud crime news दीपेंद्र शर्माने झटपट श्रीमंत होण्यासाठी पटेल यांना बिटक्वॉईनची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले आणि पटेल त्याच्या जाळ्यात अलगद अडकत गेले.

ठळक मुद्देशर्माच्या सांगण्यानुसार पटेल यांनी २३ आणि ३१ डिसेंबर २०१९ रोजी १७ बिटक्वॉईनची गुंतवणूक केली. या मोबदल्यात शर्माने ‘टेलीग्राम’ या सोशल मीडियावर मार्च २०२० मध्ये ३४ बिटक्वॉईन देण्याची थाप मारली

औरंगाबाद : शहरातील एका व्यापाऱ्याला बिटक्वॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास काही दिवसांत दुप्पट बिटक्वॉईन देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात सायबर पोलिसांनी तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

श्रेयनगर येथील रहिवासी दीपक हंसराज पटेल हे मागील १०-१५ वर्षांपासून सोशल मीडियावर मार्केटिंग आणि कन्सलटन्सी चालवतात. त्यांनी सन २०१८ मध्ये एका ॲपच्या साहाय्याने २० बिटक्वॉईन ही क्रिप्टो करन्सी खरेदी केले. यासाठी त्यांनी आपल्या ‘आयसीआयसीआय’ या बँकेतील खात्यातून नऊ लाख ५० हजार रुपये खर्च केले. सन २०१९ मध्ये त्यांनी बिटमेक्स या क्रिप्टो करन्सी एक्सचेंजर काही बिटक्वॉईन टाकून खरेदी-विक्री सुरू केली. याच दरम्यान पटेल यांची ‘टेलिग्राम’ या सोशल मीडियावर दीपेंद्र शर्मासोबत ओळख झाली. काही दिवसांनी दीपेंद्र शर्माने पटेल यांना सांगितले की, आपण ट्रेड नाईट क्रिप्टो सिग्नल हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी सोशल मीडियावर मार्केटिंग करायची असून, तुमची मदत लागेल. शर्माने झटपट श्रीमंत होण्यासाठी पटेल यांना बिटक्वॉईनची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले आणि पटेल त्याच्या जाळ्यात अलगद अडकत गेले.

शर्माच्या सांगण्यानुसार पटेल यांनी २३ आणि ३१ डिसेंबर २०१९ रोजी १७ बिटक्वॉईनची गुंतवणूक केली. या मोबदल्यात शर्माने ‘टेलीग्राम’ या सोशल मीडियावर मार्च २०२० मध्ये ३४ बिटक्वॉईन देण्याची थाप मारली; परंतु पटेल यांचा विश्वास संपादन करण्यासाठी शर्माने २५ मार्च २०२० रोजी ५ बिटक्वॉईन परत केले. त्यानंतर शर्माकडे वारंवार संपर्क साधून उर्वरित बिटक्वॉईन देण्याची मागणी केली. तेव्ही एप्रिल महिन्यात शर्माने ५.४२ बिटक्वॉईन परत केले. त्यानंतर उर्वरित २४ बिटक्वाईन परत करण्यासाठी शर्माने बिटक्वॉईनचा लाभ कसा मिळतो, यासंबंधीचा एक व्हिडिओ तयार करून पाठवावा लागेल, अशी पटेलकडे मागणी केली. त्यानुसार पटेलने तसा व्हिडिओ करून त्याला पाठवला. त्यानंतर शर्माकडे बिटक्वॉईनची मागणी केली तेव्हा त्याने पटेल यांना धमकी दिली की, यापुढे बिटक्वॉईची वारंवार मागणी केली, तर तुझा व्हिडिओ, मोबाइल क्रमांक व आयपी क्रमांक सोशल मीडियावर शेअर करुन सांगेन की, हाच दीपेंद्र शर्मा आहे आणि मी सर्वांचे बिटक्वॉईन घेऊन पळून जाईन. त्यानंतर त्याने पटेल यांना ‘टेलीग्राम’वर ब्लॉक केले व तो पळून गेला.

... आणि मुंबईत झाला गुन्हा दाखलऑक्टोबर २०२० मध्ये फेडरिको गोईल्हर्म बोरोझो दोस सान्तोस (रा. ब्राझील) याने पटेल यांना ‘टेलीग्राम’वर चॅटिंग करून तूच दीपेंद्र शर्मा आहेस. माझे बिटक्वॉईन परत केले नाही, तर तुझ्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली व त्याने अंधेरी पूर्व गुन्हे शाखेत ३५० बिटक्वॉईन चोरल्याची तक्रार दाखल केली व पटेल यांना धमकावत १७ बिटक्वॉईन काढून घेतले.

वकिलानेही दहा लाखाला गंडविलेसान्तोस याचा चेन्नई येथील वकील अभिमन्यू एस. याने पटेल यांना संपर्क साधून ही केस आपणास मिटवायची असेल, तर दहा लाख रुपये द्यावे लागतील. त्यानुसार पटेल यांनी त्याच्या खात्यावर आपल्या दोन बँक खात्यातून द्हा लाख रुपये पाठविले.

टॅग्स :BitcoinबिटकॉइनCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद