शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘डीसीसी’च्या उपविधितील तरतुदीस तात्पुरती स्थगिती

By admin | Updated: April 12, 2015 01:03 IST

उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या उपविधीतील पोटनियमानुसार आॅडीट वर्ग ‘क’ आणि ‘ड’ संस्थांच्या प्रतिनिधींना बँकेच्या निवडणुकीत संचालकपदासाठी उभारता येणार नाही़

उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या उपविधीतील पोटनियमानुसार आॅडीट वर्ग ‘क’ आणि ‘ड’ संस्थांच्या प्रतिनिधींना बँकेच्या निवडणुकीत संचालकपदासाठी उभारता येणार नाही़ या पोटनियमानुसार दाखल अर्जांपैकी अनेक अर्ज अर्ज छाननीत बाद होण्याची शक्यता होती़ पर्यायाने अनेकांना निवडणुकीपासून दूर रहावे लागणार होते़ त्यामुळे उपविधि नियमाविरोधात सतीश दंडनाईक यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले होते़ दंडनाईक यांचे अपील सहकारमंत्र्यांनी मान्य केले असून, अर्ज छाननी प्रक्रियेत बँकेच्या उपविधिला १३ एप्रिल रोजी होणाऱ्या अंतीम सुनवाईपर्यंत स्थगिती दिली आहे़ उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ संचालक निवडीसाठी निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सहकार खात्याच्या नवीन नियमांमुळे २३०० सोसायटी सभासदांपैकी केवळ ८८९ संस्था निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र ठरल्या होत्या़ त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील सुनवाईनंतर आलेल्या निकालानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक न झालेल्या तब्बल २१५ संस्थांचे ठराव अपात्र ठरवून मतदार यादी जाहीर केली होती़ त्यानंतर या सर्वंच संस्था प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून म्हणणे मांडले होते़ न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा या संस्थांच्या प्रतिनिधींना पात्र ठरविण्यात आले आहे़ त्यानंतर बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १५ जागांसाठी तब्बल २४७ अर्ज दाखल झाले आहेत़ या अर्जांची सोमवारी छाननी प्रक्रिया होणार आहे़ मात्र, बँकेने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभागाच्या दिनांक १५ एप्रिल २०१३ च्या आदेशानुसार मंजूर केलेल्या उपविधीतील पोटनियम क्रमांक ८ (फ) (४) (२) (अ) चा २ व ५ या तरतुदीमुळे ज्या संस्था आॅडीट वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग दर्जात असतील त्यांच्याच प्रतिनिधींना संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उभारता येणार आहे़ तर आॅडीट वर्ग ‘क’ आणि ‘ड’ असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींना संचालकपदासाठीच्या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही़ हा नियम नामनिर्देशनपत्र घेताना सतीश दंडनाईक यांच्या निदर्शनास आला होता़ त्यामुळे त्यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या उपविधीच्या विरोधात अपील दाखल केले होते़ जिल्ह्यात सतत निर्माण होणारी दुष्काळी स्थिती आणि त्यामुळे कर्जवसुलीबाबत शासनाकडून वेळोवेळी येणारी स्थगिती यामुळे संबंधित संस्था या आॅडीट वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मध्ये असल्याचे नमूद केले होते़ या उपविधीमुळे या संस्थांच्या प्रतिनिधींवर अन्याय होणार असल्याचे म्हटले होते़ सतीश दंडनाईक यांचे अपील सहकारमंत्र्यांनी मंजूर केले आहे़ त्यानुसार या उपविधीस १३ एप्रिल रोजी होणाऱ्या अंतीम सुनवाईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे़ सहकारमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आॅडीट वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मध्ये असलेल्या संस्थांकडून संचालकपदासाठी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे़ अंतीम सुनवाईनंतर सहकारमंत्री कोणता निर्णय देतात, याकडे अनेकांचे लक्ष आहे़(प्रतिनिधी)