शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तहसिलदार रजेवर, प्रशासकीय कामकाज वाऱ्यावर

By विकास राऊत | Updated: March 13, 2023 19:14 IST

शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन, विविध मागण्यांचे आयुक्तांमार्फत शासनाला निवेदन

छत्रपती संभाजीनगर : नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचे ग्रेड-पे-४ हजार ८०० रुपये करण्यात यावे. या मागणीसाठी १३ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज पुर्णत: ठप्प पडले होते. अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कामावर हजर होते. 

दरम्यान १४ मार्च तलाठी, महसूल कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करणार आहेत. महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केले. ग्रेड पे वाढविण्यासाठी १९९८ पासून पाठपुरावा सुरु आहे. के.पी. बक्षी वेतन त्रुटी समिती समक्ष नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे ४८०० रुपये करण्यासंदर्भात संघटनामार्फत सादरीकरण करण्यात आले. परंतु वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार अद्याप झालेला नाही. 

पहिल्या टप्यात १३ मार्च रोजी एक दिवसीय रजा घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ३ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. आंदोलनात विभागीय संघटक विजय चव्हाण, तहसिलदार ज्योती पवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे, जिल्हाध्यक्ष परेश खोसरे, प्रशांत देवडे, तेजस्विनी जाधव, अरुण पंडुरे, उद्धव नाईक, आर.व्ही. शिंदे, जी.टी.आवळे, प्रमोद गायकवाड, सचिन वाघमारे, सुधाकर मोरे, सुनील गायकवाड, रेवनाथ ताठे, योगिता खटावकर, आनंद बोबडे, प्रभाकर मुंढे हेमंत तायडे, आश्विनी डमरे आदींनी सहभाग नाेंदविला.

सरकारी कर्मचार्यांचा संप २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात राज्य तलाठी संघ १०० टक्के सहभागी होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. महसूल कर्मचारी संघटनेचे परेश खोसरे, मध्यवर्ती संघटनेचे देवीदास जरारे आदींच्य नेतृत्वात १४ पासून आंदोलन सुरू होणार आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारAurangabadऔरंगाबाद