शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या अधोगतीस तंत्रशिक्षण विभाग देखील जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:47 IST

अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांना तंत्रशिक्षण विभागदेखील जबाबदार आहे. आज प्रत्येक ठिकाणी अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकविषयी नकारात्मक वातावरण होत आहे.

ठळक मुद्देशासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका खाजगी कंपनीतर्फे शिष्यवृत्ती वाटप समारंभाचे आयोजन केले होते.

औरंगाबाद : अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांना तंत्रशिक्षण विभागदेखील जबाबदार आहे. आज प्रत्येक ठिकाणी अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकविषयी नकारात्मक वातावरण होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाला स्वत:मध्ये बदल करावा लागेल.  त्यासाठी उद्योगासोबतचा सहभाग महाविद्यालयांना वाढवावा लागणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले. 

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका खाजगी कंपनीतर्फे शिष्यवृत्ती वाटप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर एमएसबीटीचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, प्राचार्य डॉ. एफ. ए. खान उपस्थित होते. डॉ. वाघ यांच्या हस्ते तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. वाघ म्हणाले, आज जवळपास पन्नास टक्के जागा तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये रिक्त राहत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यवस्थेत देखील सुसूत्रता आणण्याची गरज आहे. तंत्रशिक्षणाविषयी आणि अभियांत्रिकीविषयी नकारात्मकता निर्माण होत आहे. व्यवस्थेतील मरगळ झटकून काम करायला हवे, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करताना तुम्हाला काय करायचे आहे. कुठे काम करायचे आहे. याबाबत स्पष्ट असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक डॉ. सीमा बोर्डे, आभार एल. आय. शेख यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. आर. एन. खडसे, प्रा. पी. टी. काळे, प्रा. एच. आर. शेख, प्रा. मकरंद भागवत, प्रा. सुदीन कुलकर्णी, एम. आर. मघाडे, प्रा. आर. एन. बुरकुल, डॉ. आर. जी. वाडेकर, प्रा. जे. एस. पाटील, प्रा. जे. डब्ल्यू. नेमाडे, प्रा. एस. एस. रगटे आदींनी प्रयत्न केले.

महाविद्यालयास एनबीए आवश्यकचपॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाने एनबीए मानांकन करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही महाविद्यालयास यापुढे सुविधा दिल्या जाणार नाहीत, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाtechnologyतंत्रज्ञान