शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 20:07 IST

शिरसाट विरुद्ध जंजाळ! जागावाटपाच्या वादातून संभाजीनगरच्या राजकारणात 'हायव्होल्टेज' ड्रामा

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये सुरू असलेला पेच आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. भाजपच्या पाचव्या प्रस्तावात शिंदेसेनेच्या वाट्यातील ७ महत्त्वाच्या जागा भाजपला देण्यात आल्याची माहिती समोर येताच, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना अश्रू अनावर झाले. "कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी निवडणूक लढणार नाही," अशी घोषणा करत जंजाळ यांनी कार्यालयातून बाहेर पडणे पसंत केले. या प्रकारामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराकडे कूच केली आहे.

अश्रू आणि आक्रोष जागावाटपाच्या नऊ बैठका होऊनही तोडगा निघत नसल्याने दोन्ही पक्षांत तणाव होता. मात्र, ताज्या प्रस्तावात जंजाळ समर्थकांचे वर्चस्व असलेले ७ प्रभाग भाजपला सोडण्यात आले. ज्या प्रभागांनी विधानसभेत पक्षाला मताधिक्य दिले, तेच प्रभाग का सोडले? असा सवाल करत जंजाळ यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यालयाबाहेर पडताना जंजाळांच्या डोळ्यातील पाणी पाहून कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट "युती तोडा, स्वबळावर लढा" अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.

शिरसाटांच्या घरासमोर कार्यकर्ते जमलेउमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्याची शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत जंजाळ आपल्या समर्थकांसह शिरसाटांच्या घराकडे रवाना झाले आहेत. पालकमंत्री शिरसाट यांनी यापूर्वी भाजपला ४१ जागांचा अल्टिमेटम दिला होता, तर मंत्री अतुल सावे यांनीही शेवटचा प्रस्ताव देत प्रतिइशारा दिला होता. आता बाहेरच्या शत्रूशी लढण्यापूर्वी शिरसाटांना स्वतःच्या घरातील (पक्षातील) नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.

सर्व मिळून निर्णय घेऊदरम्यान, पालकमंत्री शिरसाट यांनी घराबाहेर येत संतप्त कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष जंजाळ यांच्यासोबत चर्चा केली. भाजपचा प्रस्ताव आला आहे. सर्वांना बोलून निर्णय घेणार आहे. मात्र, आपल्यात गैरसमज करून घेऊ नका, शिवसैनिक लढतो. कोणावरही अन्याय होणार नाही, तुम्ही चिंता करू नका, अशी ग्वाही शिरसाट यांनी यावेळी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : High drama in Sambhajinagar: Factionalism surfaces over seat allocation.

Web Summary : Seat allocation disputes trigger high drama in Sambhajinagar's ruling coalition. A district chief wept, protesting injustice to his supporters, after BJP got key seats. Angered supporters marched on a minister's residence, chanting slogans against the alliance.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Sanjay Shirsatसंजय शिरसाट