शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

त्या शिक्षिकांना मिळणार उद्या पदस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 18:55 IST

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने औरंगाबाद जिल्हा परिषदेत आलेल्या ४५ पैकी १५ गरोदर माता, स्तनदा माता शिक्षिकांना मंगळवारपासून निर्विवाद रिक्त पदांवर पदस्थापना देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने औरंगाबादजिल्हा परिषदेत आलेल्या ४५ पैकी १५ गरोदर माता, स्तनदा माता शिक्षिकांना मंगळवारपासून निर्विवाद रिक्त पदांवर पदस्थापना देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दुसऱ्या जिल्हा परिषदांमधून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या गरोदर माता, स्तनदा माता शिक्षिकांना मिळालेल्या गैरसोयीच्या पदस्थापना बदलून द्याव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले. तथापि, ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांसोबत बोलून पदस्थापना बदलून देण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी दिल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी गरोदर माता, स्तनदा माता शिक्षिकांनी उपोषण मागे घेतले.

दुसºया दिवशी शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उपोषणार्थी शिक्षिका जिल्हा परिषदेत दाखल झाल्या. अगोदर त्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनाकडे गेल्या होत्या. तेव्हा त्यांना शिक्षणाधिकाºयांची भेट घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्या सर्व जणी शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या व त्यांनी शिक्षणाधिकाºयांकडे पदस्थापना बदलून देण्याचा आग्रह धरला. तेव्हा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या सर्वच गरोदर माता व स्तनदा माता शिक्षिकांची आक्षेप यादी प्रसिद्ध केल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाईल, असे शिक्षणाधिकाºयांनी त्यांना सांगितले. त्यावेळी आपली फसवणूक झाली, असा समज करत त्या सर्व उपोषणार्थी गरोदर माता व स्तनदा माता शिक्षिकांनी पुन्हा मुख्यालयाबाहेर मंडप टाकला व उपोषण सुरू केले.

दरम्यान, रविवारी दुपारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आमदार प्रशांत बंब यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या दालनात उपोषणार्थी स्तनदामाता, गरोदरमाता शिक्षिकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यावेळी शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल हेदेखिल उपस्थित होते. मंगळवारपासून निर्विवाद रिक्त जागांवर टप्प्या टप्प्याने पदस्थापना बदलून देण्याचा जि.प. प्रशासनाने निर्णय घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.समानीकरणाच्या जागांचा विचार नाहीयासंदर्भात शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले की, जिल्ह्यात जि. प. शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षकांची ५१, तर उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची ५ निर्विवाद पदे रिक्त आहेत. यापैकी औरंगाबाद तालुक्यात सोयीच्या केवळ ५ जागा आहेत. मंगळवारी गरोदर माता व स्तनदा माता शिक्षिकांना समुपदेशन पद्धतीने निर्विवाद रिक्त पदे दाखविली जातील. ज्यांना ती सोयीची वाटणार नाहीत, अशा शिक्षिकांना सेवानिवृत्तीमुळे भविष्यात रिक्त होणाºया पदांवर उर्वरित शिक्षिकांना टप्प्याटप्प्याने पदस्थापना बदलून दिल्या जातील. समानीकरणाची पदांवर या शिक्षिकांचा विचार केला जाणार नाही. समानीकरणाची पदे खुले करण्याची शासनाची परवानगी नाही.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद