शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या दारी अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 19:15 IST

त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांचे अनुदान घोषित करण्याची मागणी शिक्षक समन्वय संघाने केली आहे.

औरंगाबाद -खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या २० टक्के अनुदान, २० टक्क्यांवरून ४० टक्के अनुदान करताना त्रुटींची सुनावणी शिक्षक आमदारांसमोर विभागनिहाय झाली. त्रुटी पूर्तता होऊन ९ महिने सरले, अद्याप शाळांचे अनुदान घोषित झाले नाही. त्यामुळे त्रुटीत अडकलेल्या शाळांच्या शिक्षकांनी आजपासून सिडकोतील शिक्षक आ. विक्रम काळे यांचे घर गाठून घरासमोर धरणे आंदोलन सुरू केले.

राज्य शासनाने १२, १५ व २४ फेब्रुवारी २०२१ रोजी शाळा अनुदान घोषित करण्यात आले. यात काही शाळांना २० टक्के अनुदान नव्याने तर काही शाळांना २० वरून ४० टक्के अनुदान सुरू करण्यात आले. यावेळी २० टक्के अनुदानावरील प्राथमिक व माध्यमिक शाळांना व नव्याने २० टक्के घेण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पात्र होऊन क्षुल्लक कारणांवरून अपात्र ठरवले गेले. त्या शाळांना ३० दिवसांची मुदत देऊन विभागनिहाय सुनावणी शिक्षक आ. काळे यांच्यासमोर झाली. तब्बल ९ महिन्यानंतरही त्रुटींची पूर्तता करुन ही अद्याप शाळांचे अनुदान घोषित झाले नाही. आ. काळे यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी शिक्षक समन्वय संघाचे के. पी. पाटील, दीपक कुलकर्णी, नेहा गवळी, गजानन काकड, अमोल हलगडे, एस बी वावरे, एस आर डोगराव यांच्यासह आंदोलनकर्त्या शिक्षकांनी केली. यात औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होता.

आंदोलक आक्रमक...राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे यांनी आंदोलकांचे आ. काळे यांच्याशी मोबाईलवरून बोलणे करून दिले. काळे यांनी बुधवारी पुण्यात भेटण्याचे आश्वासन देत शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवले. शिक्षक आमदारांच्या दारी दिवाळी साजरी करत असून त्यांनी दिवाळी द्यावी म्हणून शिक्षकांनी दुरडी घेऊन आ. काळे यांच्या घरासमोर सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत धरणे दिले. मंगळवारी सकाळी सुरु होणारे आंदोलन मागणी पूर्ण होईपर्यंत सुरू राहील, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबाद