शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शिक्षकांचे जानेवारीचे वेतन होणार उशिरा; 'शालार्थ' सर्व्हर बंदचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 12:44 IST

शिक्षकांच्या पगाराची बिले तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे १० जानेवारीपासून सर्व्हर बंद आहे. त्यामुळे शाळांना शालार्थ वेतनप्रणालीमध्ये पगारासंबंधीची माहिती भरता आली नाही.

ठळक मुद्देशाळांकडून दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत शिक्षकांच्या पगाराची बिले वेतन पथकाकडे दिली जातात.पगारांची बिले शालार्थ वेतनप्रणालीमध्ये तयार होऊन त्याची ‘हार्ड कॉपी’ वेतन पथकाकडे दिली जाते. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडणार्‍या शालार्थ वेतनप्रणालीचे सर्व्हर गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे.

औरंगाबाद : शिक्षकांच्या पगाराची बिले तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे १० जानेवारीपासून सर्व्हर बंद आहे. त्यामुळे शाळांना शालार्थ वेतनप्रणालीमध्ये पगारासंबंधीची माहिती भरता आली नाही. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांचे जानेवारीचे वेतन उशिरा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिक्षकांमध्ये यासंबंधी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

शाळांकडून दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत शिक्षकांच्या पगाराची बिले वेतन पथकाकडे दिली जातात. पगारांची बिले शालार्थ वेतनप्रणालीमध्ये तयार होऊन त्याची ‘हार्ड कॉपी’ वेतन पथकाकडे दिली जाते. त्यानंतर वेतन पथकामार्फत त्याची पडताळणी करून ते मंजूर केले जाते; मात्र ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडणार्‍या शालार्थ वेतनप्रणालीचे सर्व्हर गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. अनेक शाळांची पगाराची बिले अपलोड झालेली नाहीत. अनेक शाळा त्यापासून वंचित राहिल्या आहेत. सर्व्हर आणखी काही दिवस बंद राहिले, तर राज्यातील शिक्षकांच्या जानेवारीच्या पगाराला कमालीची दिरंगाई होण्याची शक्यता आहे. 

शिक्षक संघटना संतप्तशिक्षक संघटनांमध्ये तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शालार्थ वेतनप्रणालीचे सर्व्हर १५ दिवसांपासून बंद असल्यामुळे राज्यभरातील सर्व शिक्षकांचे जानेवारीचे वेतन उशिराच होणार आहे. शिक्षकांच्या पगाराबाबतचा विलंब होणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. दरमहा शिक्षक मंडळी वेळेवर पगार मिळावा म्हणून आर्त टाहो फोडत असतात. तरीही गेंड्याची कातडी पांघरणार्‍या सुस्त प्रशासनाच्या कार्यपद्धतीत काहीच बदल होत नाही. शालार्थ वेतनप्रणालीद्वारे ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाही सातत्याने वेतनासाठी दिरंगाई होत आहे. वास्तविक पाहता शिक्षकांची वेतन देयके दरमहा प्रशासनाकडे विहित मुदतीत देऊनही शिक्षकांचे वेतन वेळेत कधीच होत नाही. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकMONEYपैसा