शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘विनाअनुदानित’वरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची शिक्षकांची याचिका नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:37 IST

‘विनाअनुदानित’ तुकड्यांवरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. अरुण ढवळे यांनी नामंजूर केली.

 

औरंगाबाद : ‘विनाअनुदानित’ तुकड्यांवरून ‘अनुदानित’ तुकड्यांवर बदली करण्याची याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. अरुण ढवळे यांनी नामंजूर केली.२८ जून २०१६ च्या परिपत्रकानुसार बदली करण्याचा हक्क व्यवस्थापनाला आहे; परंतु शिक्षकांना तसा हक्क नाही, असे स्पष्ट करीत खंडपीठाने याचिकाकर्त्या शिक्षकांची याचिका नामंजूर केली.यासंदर्भात जालना येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ संचलित श्री महावीर स्थानकवासी जैन विद्यालयातील प्रदीप राठोड आणि इतर ८ शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या शाळेत अनुदानित आणि विनाअनुदानित तुकड्या आहेत. २८ जून २०१६ च्या परिपत्रकानुसार विनाअनुदानित तुकड्यांवरून अनुदानित तुकड्यांवर बदली करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.याचिकाकर्त्यांच्या विनंतीला व्यवस्थापनातर्फे विरोध करताना अ‍ॅड. विवेक ढगे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २८ जून २०१६ चे ‘परिपत्रक’ आहे, ‘शासन निर्णय’ नाही, म्हणून परिपत्रकातील तरतुदी व्यवस्थापनावर बंधनकारक नाहीत. बदली करावी किंवा नाही हा व्यवस्थापनाचा हक्कआहे. बदल हा कर्मचाऱ्यांचा हक्क होऊ शकत नाही. शिवाय सदर संस्था ही अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे राज्यघटनेच्या कलम ३० नुसार व्यवस्थापन करताना व्यवस्थापनाला स्वायत्तता आहे. शिक्षकांच्या नेमणुका हा स्वायत्ततेचा भाग आहे. सुनावणीअंती खंडपीठाने याचिका नामंजूर केली.

 

टॅग्स :Courtन्यायालयTeacherशिक्षक