शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Teachers Day 2018 : ...वाचा काय आहे फिल्मी गुरुजींचा 'गुरुमंत्र' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 18:49 IST

वाचा चित्रपटात कलावंतांच्या गाजलेल्या काही भूमिका आणि त्यांचा 'गुरुमंत्र'...

औरंगाबाद : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्म दिन. 'शिक्षक दिन' म्हणून तो साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्वजण आपल्या गुरूंचे स्मरण करत आहेत. आपल्या जीवनातील गुरु आपल्याला कायम प्रोत्साहन देत असतात. यासोबतच काही कलावंतानीसुद्धा चित्रपटात केलेल्या शिक्षकाच्या भूमिका अशाच प्रेरणादायी आहेत. यामुळेच या भूमिका आणि ते कलाकार असे समीकरणच झाले आहे. वाचा अशाच गाजलेल्या काही भूमिका आणि त्यातील गुरूने दिलेला 'गुरुमंत्र'....

ज्ञानाचा नफा अखेरच्या क्षणापर्यंत 

ज्ञान ही एकमेव अशी गुंतवणूक आहे, ज्याचा नफा अखेरच्या क्षणापर्यंत मिळतो. सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी घर, कपडे, अन्न याशिवाय कुठली गोष्ट अत्यावश्यक असेल तर ते शिक्षण आहे. तुमच्याजवळ पैसा आहे. तो आपण सोन्यामध्ये गुंतवू शकतो. पैसा काय किंवा सोने काय, चोरी होण्याचे भय कायम असते. हाच पैसा ज्ञानामध्ये गुंतविला तर तो कमी होत नाही आणि चोरीही होण्याची भीती राहत नाही. - अमिताभ बच्चन (एका कार्यक्रमात)

'वेळ' तुमच्याकडून कोणी हिरावून घेणार नाही तुमच्याजवळ ७० मिनिटे आहेत, जी आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आहेत. आज तुम्ही चांगले खेळा वा वाईट, ही ७० मिनिटे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. जा मन भरून खेळा. कारण येणाऱ्या आयुष्यात काही चांगले होईल; अथवा होणारही नाही. हारा वा जिंका. काही झाले तरी ही ७० मिनिटे तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कोणीच नाही. या सामन्यात कसे खेळायचे हे मी सांगणार नाही. ते तुम्ही सांगायचे आहे, प्रत्यक्षात खेळ    करून. - शाहरूख खान (चक दे इंडिया)

प्रत्येकामध्ये स्वत:चा गुण असतोबाहेर मनं जळालेल्या माणसांची दुनिया वसली आहे. प्रत्येकाला आपल्या घरात टॉपर्स हवे आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, एमबीबीएसपेक्षा कमी कोणालाच चालत नाही. ९५.२ टक्के, ९५.३ टक्के, ९५.७ टक्के यापेक्षा कमी गुण म्हणजे गुन्हाच. असे का? प्रत्येकामध्ये स्वत:चा गुण असतो. त्याची आवड असते. आम्ही स्वत:च्या आवडीखातर त्याचे करिअर ताणत राहतो. अगदी तुटेपर्यंत ते ताणत राहतो. - आमिर खान (तारे जमीं पर) 

कामगार निर्माण करायचे आहेत का?आपण काय विद्यार्थ्यांना फक्त २१ अपेक्षित, बे एके बे, सीओटू, एचटूओ एवढेच शिकवायचे? परीक्षेतील मार्क बॅगेत घालून सिलिकॉन व्हॅलीला जाणारे कामगार निर्माण करायचे आहेत का? शिक्षणामध्ये जगण्याचे साधे साधे प्रश्न कसे सोडवायचे किंवा या असंख्य गरीब मुलांनी कष्ट करताना स्वाभिमानाने कसे उभे राहायचे, याचे शिक्षण असणारच नाही का? - अतुल कुलकर्णी (दहावी फ)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmitabh Bachchanअमिताभ बच्चनAamir Khanआमिर खानShahrukh Khanशाहरुख खानAtul Kulkarniअतुल कुलकर्णीTeachers Dayशिक्षक दिन