शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेने निलंबित केल्यामुळे शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:02 IST

शायनिंग स्टार या मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकाला संस्थाचालकाने निलंबित केले. या शाळेच्या चौकशीला विलंब होत असल्यामुळे शिक्षक मुकीम महेबूब पटेल यांनी बुधवारी सकाळी जि.प.त विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. मुकीम पटेल यांना घाटीत दाखल केले. या प्रकारामुळे जि.प.त खळबळ उडाली.

ठळक मुद्देजि.प.त खळबळ : पोलिसांची धावाधाव; शिक्षकाला वेळीच पकडल्याने अनर्थ टळला

औरंगाबाद : शायनिंग स्टार या मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकाला संस्थाचालकाने निलंबित केले. या शाळेच्या चौकशीला विलंब होत असल्यामुळे शिक्षक मुकीम महेबूब पटेल यांनी बुधवारी सकाळी जि.प.त विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. मुकीम पटेल यांना घाटीत दाखल केले. या प्रकारामुळे जि.प.त खळबळ उडाली.खडकेश्वर येथील शायनिंग स्टार मराठी प्राथमिक शाळा व आझाद अली शाह शिक्षण संस्था अंतर्गत चालणाऱ्या चार शाळांची विभागीय चौकशी करावी, सेवेत सामावून घ्यावे, यासाठी मुकीम पटेल यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी (दि.६) आत्महत्या करण्याचा इशारा देणारे निवेदन दिले होते. यानुसार पोलिसांनी जि.प.मध्ये बंदोबस्त लावला होता. शिक्षक मुकीम पटेल हे कुटुंबियांसोबत अचानक रिक्षातून आले. त्यांनी रिक्षा थेट मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या दालनाकडे आणली. त्याठिकाणी तैनात पोलिसांच्या लक्षात ही बाब आल्यामुळे त्यांनी धाव घेतली. मुकीम पटेल यांनी खिशातून विषाची बाटली काढली. विष घेत असतानाच पोलिसांनी बाटली फेकून देऊन त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा एकच धावपळ सुरू झाली. कुटुंबियांनी रडण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ज्या रिक्षामधून मुकीम पटेल आले होते, त्याच रिक्षातून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी त्या शिक्षकाची भेट घेतली. शिक्षकाने मागणी केलेल्या संस्थेच्या चार शाळांची चौकशी गटशिक्षणाधिकाºयातर्फे केली आहे. याविषयीचा अहवाल येत्या दोन दिवसात मिळेल. त्यात संबंधित शाळांमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी दिली. मुकीम पटेल यांना संस्था प्रशासनाने तोंडी आदेशाने निलंबित केलेले आहे. याविरोधात त्यांनी शाळा न्यायाधिकरणामध्ये दाद मागितली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे संस्था प्रशासनाला शिक्षणाधिकारी कार्यालयात कोणत्याही सूचना देऊ शकत नसल्याचे जैस्वाल यांनी स्पष्ट केले.-------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTeacherशिक्षक