वडीगोद्री : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील जि.प.शाळेतील शिक्षकास भाडेतत्त्वावर घेतलेली खोली का सोडली म्हणून सात जणांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात सातजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे शाळेत घुसून शिक्षकास मारहाण झाली. जि.प.शाळेतील शिक्षक श्रीमंत छंदरराव नागरगोजे (२७) हे शहागड येथे किरायाने खोली करून राहत होते. काही दिवसांनी त्यांनी गोंदी येथे खोली केली. याच कारणावरून तसेच आमच्या महिलांना तुम्ही शिवीगाळ केल्याचे सांगत सात जणांनी मारहाण केली. या प्रकरणी भीमराव कागदे, गुणेश्वर कोळपकर, विलास केरूळकर, अनिल खेडकर, नवनाथ मडके, शुभम डोंगरे, विष्णू जोगदंड यांच्याविरूद्ध नागरगोजे यांच्या तक्रारीवरून ३५३, १४३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तीन फरार आहेत. (वार्ताहर)
जि.प.शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण
By admin | Updated: December 8, 2015 00:03 IST