शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली शिक्षकाचा मृत्यू; अपघात की आत्महत्या? कारण अस्पष्ट

By राम शिनगारे | Updated: April 9, 2023 21:05 IST

शिवाजीनगर परिसरातील घटना, जवाहरनगर ठाण्यात नोंद

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा धावत्या रेल्वेच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वे फाटक परिसरात घडली. ही आत्महत्या आहे की, अपघातात मृत्यू हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.

रामानंद आनंदराव दरबेसवार (५२, रा. ज्ञानेश्वरनगर, शहानूरवाडी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरबेसवार हे दौलताबाद परिसरातील रामपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जातो, असे सांगून ते घराबाहेर पडले. रेल्वे रुळावरून जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसची त्यांना जोराची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे दृश्य पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींनी पाहिल्यानंतर त्यांनी जवाहरनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरबेसवार यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास जवाहरनगर पोलिस करीत आहेत.

पत्नी शिक्षिका, तर मुलगी डॉक्टररामानंद दरबेसवार यांच्या पत्नीही जिल्हा परिषदेच्याच शिक्षिका आहेत. त्यांची मुलगी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याशिवाय एक मुलगा हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करीत आहे. आर्थिकसह इतर प्रकारचे स्थैर्य असताना दरबेसवार यांनी आत्महत्या केली की, रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. याचा उलगडा झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद